
Nashik : ‘हेक्रा’ मोजणार पूरपातळी
नाशिक : जलसंपदा विभागाने (Water Resources Department) गोदावरी व उपनद्यांवर निळी व लाल पूररेषा (Flood Line) आखली असली तरी दोन्ही पूररेषांमध्ये चार मीटरचे अंतर आहे. लाल रेषेकडून निळ्या रेषेपर्यंत पुराची पातळी वाढत असताना नागरी वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरून जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे.
त्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाच्या ‘हेक्रा’ या सॉफ्टवेअरच्या मदतीने दोन्ही पूर रेषांमध्ये पूर प्रभावित क्षेत्राची आखणी केली जाणार आहे. अशी माहिती महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी दिली. (flood level will measure hekra software Nashik latest Marathi news)
२००८ मध्ये गोदावरी व उपनद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला. पुरामुळे नदीकाठच्या दोन्ही बाजू बाधित झाल्या होत्या. पारंपरिक पद्धतीने पूर मोजण्याचे परिमाण असलेल्या सरकार वाड्याच्या आठ पायऱ्या बुडाल्या होत्या.
पुरामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्यानंतर जलसंपदा विभागाने गोदावरी व उपनद्यांचे रेखांकन केले. नद्यांच्या मध्यापासून लाल व निळी रेषा आखण्यात आली. मध्यापासून ६६३ मीटरवर लाल, तर ६६७ मीटर अंतरावर निळी पूर रेषा आखण्यात आली.
दोन्ही रेषांमध्ये चार मीटरचे अंतर आहे. मधल्या चार मीटर अंतरामध्ये पूर पातळी वाढत असताना मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती बाधित होते. त्यामुळे पुराची पातळी वाढत असताना नागरिकांना माहिती व्हावी व जीवित, वित्तहानी टाळावे या उद्देशाने पूर पातळीचे रेखांकन करण्यासाठी जलसंपदा विभागाकडील हेक्रा या सॉफ्टवेअरचा उपयोग करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा: विजेच्या धक्क्याने माकडाचा मृत्यू; कापशी गावातील घटना
जलसंपदा विभागाने या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून यापूर्वी पूररेषा निश्चित केली आहे. महापालिकेने या संदर्भात जलसंपदा विभागाला पत्र लिहिले असून, रेखांकन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सॉफ्टवेअरच्या माध्यमातून रेखांकन झाल्यानंतर एकत्रित कंट्रोल मॅप तयार केला जाणार आहे. धरणातून पाणी सोडल्यानंतर पूर पातळी जशी वाढत जाईल. त्याप्रमाणे पूर प्रभाव क्षेत्राची माहिती महापालिकेला संगणकावर उपलब्ध होईल त्यानुसार उपाययोजना करणे सोपे जाणार आहे.
आराखडा तयार होणार
अहिल्यादेवी होळकर पूल ते टाळकुटेश्वर पूल परिसर या दरम्यान नदीच्या दोन्ही बाजूच्या पूर रेषांमध्ये रेखांकन केले जाणार आहे. या भागात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे.
त्यामुळे पहिल्या टप्प्यात या भागातील रेखांकन केले जाणार आहे. रेखांकनानंतर नगररचना विभागाच्या माध्यमातून पाण्याचे पातळी वाढल्यास कुठल्या भागातील घरे बाधित होऊ शकता याचा आराखडा तयार होणार आहे.
हेही वाचा: Rain Update : जायकवाडी चौथ्या वर्षी ‘फुल्ल’ होणार
Web Title: Flood Level Will Measure Hekra Software Nashik Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..