Floriculture : जानोरीच्या फुलशेतीची परदेशी पाहुण्यांना भुरळ!

A flower farm flourished by the Ghumre and Dawane families
A flower farm flourished by the Ghumre and Dawane familiesesakal

ओझर (जि. नाशिक) : जानोरी गावचे प्रगतिशील शेतकरी ज्ञानेश्वर डवणे पाटील आणि दत्तात्रेय घुमरे पाटील यांची गुलाबाची शेती व पॉलिहाऊसमध्ये शेवंतीच्या फुलांची शेती आणि उत्तम प्रकारचा गुलाब, अनेकविध रंगांची शेवंती बघण्यासाठी मलेशियामधील अधिकारी वर्ग नुकतेच जानोरीत येऊन गेले. घुमरे व डवणे परिवाराची शेती व्यवस्था पाहून त्यांचे भरभरून कौतुक केले. (floriculture flower farm attracts foreign visitors at Janori nashik news)

डवणे पाटील आणि घुमरे पाटील यांची गुलाबाची शेती पाहायला आलेल्या मलेशियन पाहुण्यांबरोबर परिवारातील कृषी कन्या व फुलांची शेती.
डवणे पाटील आणि घुमरे पाटील यांची गुलाबाची शेती पाहायला आलेल्या मलेशियन पाहुण्यांबरोबर परिवारातील कृषी कन्या व फुलांची शेती.esakal

दत्तात्रय घुमरे व ज्ञानेश्वर डवणे यांनी फुलशेतीचा उत्तमप्रकारे विकास केलेला आहे. ही बाब जानोरी गाव व जिल्ह्यासाठी अभिमानाची असल्याची प्रतिक्रिया परिसरात व्यक्त होत आहे. संदीप बाळासाहेब घुमरे व अरुण घुमरे, विजय घुमरे आदींनी परदेशी पाहुण्यांना शेतीची माहिती दिली.

डवणे पाटील परिवार व घुमरे पाटील परिवाराने ‘अतिथी देवो भव’ या भारतीय संस्कृतीनुसार शाल, टोपी व फुलांचा गुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. परदेशी पाहुण्यांना पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी बांधव व नागरिकांनी गर्दी केली होती.

A flower farm flourished by the Ghumre and Dawane families
Panjarpol Drone Survey : गायरान जमिनीबाबत होणार ड्रोन सर्वेक्षण; राज्य शासनाने मागविला अहवाल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com