नाशिक: हरतालिका, त्यानंतर गणरायाचे आगमन यामुळे सर्वच प्रकारच्या फुलांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मात्र संततधारेने सर्वच प्रकारची फुले खराब झाल्याने मागणीपेक्षा पुरवठ्यात घट झाली आहे. त्यामुळे झेंडूसह सर्वच प्रकारच्या फुलांना सोन्याचे मोल आले असून, ते सद्या ‘भाव’ खाऊन जात आहेत.