esakal | नाशिकमध्ये ग्राहकांअभावी कोमेजला फुलबाजार

बोलून बातमी शोधा

flower.
नाशिकमध्ये ग्राहकांअभावी कोमेजला फुलबाजार
sakal_logo
By
दत्ता जाधव

नाशिक : मोठ्या लग्नांची धामधूम थंडावली असून श्रीराम, कपालेश्‍वरासह अन्य मोठी मंदिरे प्रशासनाच्या आदेशानंतर बंदच आहे. त्यामुळे काही दिवसांपासून बहरलेला गणेशवाडीतील फुलबाजार ग्राहकांअभावी कोमेजला आहे. याचा परिणाम फुलांच्या उप्तादकांसह विक्रेत्यांवर झाला आहे.

फुलांना ग्राहकच नाही.

फेब्रुवारी, मार्चपर्यंत गणेशवाडीतील महापालिका शाळेपासून ते थेट गाडगे महाराज पुलाच्या दुस-या टोकापर्यंत फुलबाजार बहरला होता. त्यामुळे उप्तादक शेतक-यांसह विक्रेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. परंतु आता लग्न समारंभ अवघ्या पंचवीस व-हाडींच्या उपस्थितीत करण्याचे फर्मान निघाल्याने तसेच मोठी मंदिरेही बंद असल्याने या फुलांना ग्राहकच नाही. त्यामुळे सद्या चांगले अर्थाजन होणा-या या व्यवसायावर कोरोनामुळे मोठा परिणाम झाला आहे.

भावात मोठी घसरण; शेतक-यांसह विक्रेते त्रस्त

कधीकाळी सराफ बाजार भरणारा फुलबाजारामुळे फुल विक्रेते व सराफी व्यावसायिक यांच्यात होणारे वादावादीचे कटू प्रसंग टाळण्यासाठी पालकमंंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नाने हा बाजार गणेशवाडी परिसरात स्थलांतरीत झाला. गत दोन महिन्यांपूर्वी हा बाजार चांगलाच फुलला होता. परंतु आता गर्दीबरोबरच भावातही मोठी घसरण होत असल्याने शेतक-यांसह विक्रेते त्रस्त आहेत. एकीकडे तीव्र उन्हातही पिकविलेली फुलशेती तर दुसरीकडे भावच मिळत नसल्याने ही परिस्थिती आेढावल्याचे शेतकरी सांगतात. याठिकाणी आडगाव, ओझर, नांदूर, मानूर, मखमलाबाद, गंगापूर, म्हसरूळ भागातून शेतकरी फुले विक्रीसाठी आणतात.

हेही वाचा: एका डोसनंतर कोरोनाबाधितांचे प्रमाण ३ ते ४ टक्क्यांपर्यंत.. आरोग्य विभागापुढे आव्हान

सध्या फुलांचे दर -

1) झेंडू जाळी 60 ते 80 रू. 100 ते 120

2) शेवंती (किलो) 70 ते 80 160 ते 200

3) गुलाब (जुडी) 7 ते 10 रूपये 12 ते 20 रू.

4) मोगरा 300 ते 400 600 ते 800

5) लिली (बंडल) 4 ते 5 रू. 10 ते 15

हेही वाचा: स्वाईन फ्लूचे औषध कोरोनावर ठरेल परिणामकारक?

''फुलांच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नसल्याने आता फूलशेती आतबट्ट्याची होऊ लागली आहे. एकीकडे उत्पादन खर्च वाढत असून दुसरीकडे भावही मिळत नाही.''

- महेश राऊत, शेतकरी, आडगाव