नाशिक: पाथर्डी फाट्यापासून आडगावपर्यंत उड्डाणपुलावरून जाताना वाहनचालकांना कंपने (व्हायब्रेशन) जाणवत आहे, त्यामुळे हे नक्की कशामुळे होते याचा अंदाज येत नसल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. मात्र, तांत्रिकदृष्ट्या दुरुस्ती सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर कंपनाचे प्रमाण कमी होईल. मात्र, पुलाला आताही कोणताही धोका नाही, असे महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले आहे.