Nashik Crime: अन्न अन् औषध प्रशासन कार्यालयाकडून 3 हजार लिटर भेसळयुक्त दुधाचा साठा नष्ट

Nashik Crime: अन्न अन् औषध प्रशासन कार्यालयाकडून 3 हजार लिटर भेसळयुक्त दुधाचा साठा नष्ट
esakal

Nashik Crime : अन्न व औषध प्रशासन, नाशिक व जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी नाशिक व अन्न चाचणी प्रयोगशाळा यांच्या संयुक्त पथकाने गुरुवारी (ता. ६) नाशिक शहरात येणारे व जिल्ह्यातून मुंबईला वितरित होणाऱ्या दूध भेसळ तपासणीसाठी संयुक्त मोहीम राबविली.

मोहिमेत चार वाहनांतील ६६ हजार ७६३ लिटर दूध साठ्याची जागेवर तपासणी केली. (Food and Drug Administration office destroyed 3 thousand liters of adulterated milk stock Nashik Crime)

त्यातील मे. प्रवरा मिल्क प्रोसेसिंग (कासार दुमला, ता. संगमनेर) यांचे वाहन (एच ४८, एजी ४६९२) ची भाटवाडीगाव (ता. सिन्नर, जि. नाशिक) येथे तपासणी केली असता, त्यात भेसळकारी पदार्थाची प्राथमिक चाचणीत दोष आढळून आला.

त्यातील दुधाचा अन्न नमुना विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित सुमारे तीन हजार २० लिटर (किंमत एक लाख १३ हजार २५०) साठा नाशवंत असल्याने जनआरोग्याच्या हिताच्या दृष्टीने जागेवर नष्ट करण्यात आला, अशी माहिती अन्न व सुरक्षा विभागाचे सहआयुक्त संजय नारगुडे व सहाय्यक आयुक्त मनीष सानप यांनी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik Crime: अन्न अन् औषध प्रशासन कार्यालयाकडून 3 हजार लिटर भेसळयुक्त दुधाचा साठा नष्ट
Pune Crime News : पुणे हादरलं! सुप्रिया सुळेंच्या निकटवर्तीय माजी नगरसेवकाची कोयता-कुऱ्हाडीने हत्या

कार्यवाही सहआयुक्त नारगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त मनीष सानप, उ. शी. लोहकरेसह अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती सु. दे. महाजन, योगेश देशमुख, अमित रासकर, गोपाल कासार व एस. के. पाटील, योगेश नागरे, निवृत्ती साबळे व नमुना सहाय्यक विजय पगारे आदींनी केली.

"मोहिमेत एकूण चार नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त होताच अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ अन्वये पुढील कारवाई करण्यात येईल. मोहीम यापुढे अशीच सुरू राहणार आहे. अन्न व्यावसायिकांनी दूध या अन्नपदार्थात भेसळ करू नये. भेसळ करताना आढळून आल्यास संबंधितावर कडक कारवाई केली जाईल. दूध भेसळीसंबंधी माहिती असल्यास प्रशासनाच्या टोल फ्री १८००२२२३६५ या क्रमांकावर संपर्क करावा."

- संजय नारगुडे सहाय्यक आयुक्त (अन्न), नाशिक विभाग

Nashik Crime: अन्न अन् औषध प्रशासन कार्यालयाकडून 3 हजार लिटर भेसळयुक्त दुधाचा साठा नष्ट
Sambhajinagar Crime : वाहनाला हुलकावणी दिल्याच्या कारणावरून वाद; हल्ल्यात जखमी शेतकऱ्याचा मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com