Nashik News : होणार आहे... पण कधी? फूड प्रोसेसिंग हबची घोषणा विरली हवेत

Food Processing
Food Processingsakal

Nashik News : देशाचे फूड बास्केट म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिकला अनेक घोषणा झाल्या; परंतु त्यातील बोटावर मोजण्याइतक्या योजना प्रत्यक्षात आल्या असतील. अनेक घोषणा अशा आहेत, की ज्या पक्षाच्या नेत्यांनी घोषणा केल्या, त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही त्या योजनेबद्दल माहीत नाही.

कधी, केव्हा अशा प्रकारची उत्तरे मिळतात. त्या वेळी दुर्दैव एवढेच म्हणावे लागते. हवेत विरलेली अशीच एक घोषणा म्हणजे फूड प्रोसेसिंग हब.

भाजीपाल्यासह अनेक फळे, पिके नाशिकच्या मातीत घेतली जात असल्याने सन २०१९ च्या राज्याच्या अर्थसंकल्पात तत्कालीन राज्यकर्त्यांनी नाशिकमध्ये फूड प्रोसेसिंग हब घोषित केला; परंतु अद्यापही असा हब किंवा त्यादृष्टीने प्रयत्न झाले नाहीत. (Food processing hub announced in Nashik but still no such hub or efforts towards it news)

धान्य, फळे व भाजीपाल्याचे कोठार म्हणून नाशिकची ओळख आहे. मुंबईची भाजी मंडई व गोशाळा असेही पूर्वीच्या काळी म्हटले जायचे. अद्यापही नाशिकमधून मोठ्या प्रमाणात मुंबईला भाजीपाला पोहोचतो. ‘कसमादे’ परिसरात रस्त्यांचे जाळे पसरल्याने सुरत व बडोद्याच्या बाजारातही नाशिक जिल्ह्यातील भाजीपाला जलद गतीने पोहोचतो. मुंबई व उपनगरांच्या रेल्वेस्थानकांबाहेर नाशिकच्या भाजी विक्रेत्यांची दुकाने थाटलेली असतात.

कल्याण, डोंबिवली, ठाणे, पुढे मुलुंड ते दादरपर्यंत रेल्वेस्थानकांच्या बाहेर सायंकाळनंतर नाशिकच्याच भाजी विक्रेत्यांची गर्दी असते. सकाळी नाशिकच्या विविध बाजार समित्यांमध्ये लिलाव होतात. पुढे मुंबईकडे सायंकाळपर्यंत भाजीपाला, फळे पोहोचून विक्री होऊन लगेचच विक्रेते माघारी फिरतात. आता ऑनलाइन भाजी विक्रीच्या माध्यमातूनही घरोघरी नाशिकचा भाजीपाला, फळे पोहोचतात.

नाशिक तालुक्यातील टोमॅटो, मिरची लासलगाव, निफाड तसेच जिल्ह्यातील ९० टक्के भागात निर्यातक्षम कांदा पिकविला जातो. आशिया खंडातील सर्वांत मोठी बाजारपेठ लासलगाव आहे. द्राक्ष मोठ्या प्रमाणात पिकतात. त्यामुळे ‘कॅपिटल ऑफ वाइन’ म्हणून नाशिकचा उल्लेख आहे. ‘कसमादे’ भागात डाळिंबाचे पीक घेतले जाते. आदिवासी भागात आता स्ट्रॉबेरीचे पीक मोठ्या प्रमाणात होते. पेरू, ऊस, चिकूची पिकेही मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे नाशिकला देशाचे फूड बास्केट म्हटले जाते.

शेती व शेतीपूरक व्यवसायाचे जाळे पसरले असल्याने राजकीय पक्षांकडून फूड प्रोसेसिंग युनिटला चालना देण्याची गोष्ट केली जाते. सन २०१९ मध्ये युती शासनाच्या शेवटच्या अर्थसंकल्पात नाशिकमध्ये फूड प्रोसेसिंग हबची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली. त्यासाठी स्वस्तात वीजपुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

Food Processing
Nashik Onion News : पहिल्याच दिवशी कांद्याचे दर घसरले; जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरू

या घोषणेचा पुनरुच्चार गंगाघाटावरील सभेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला; परंतु अद्याप फूड प्रोसेसिंग युनिटसंदर्भात काहीच झाले नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. सरकार पडून १५ महिने उलटले, तरी फूड प्रोसेसिंग युनिटबद्दल अद्यापही काहीच झालेले नाही. राजकीय नेत्यांच्या गावी फूड प्रोसेसिंगचा विषयही नाही.

फूड प्रोसेसिंग युनिटचे फायदे

- शेतमालाला तत्काळ उठाव

- शेतमाल खराब होण्याची शक्यता कमी

- शेतमालाला भाव

- शेतीपूरक व्यवसायाला चालना

"फूड प्रोसेसिंग युनिटपेक्षा त्याला पूरक अशा सुविधा सरकारने पुरविल्या, तरी चालना मिळणार आहे. वीज, कमी व्याजदरात कर्जपुरवठा यांसारख्या सुविधा पुरविल्यास फायदेशीर ठरेल. नाशिकला फूड बास्केट संबोधले जाते. त्यामुळे येथे फूड प्रोसेसिंग युनिटला लगेचच चालना मिळेल." - विलास शिंदे, चेअरमन, सह्याद्री अॅग्रो फार्म्स

"जिल्ह्यात शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शेतमाल प्रक्रिया उद्योग सुरू होणे ही काळाची गरज आहे. त्यादृष्टीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेळा फूड प्रोसेसिंग युनिटची घोषणा केली; पण त्यांना दत्तक नाशिकचा विसर पडलेला दिसतो. त्यामुळेच कांदा, टोमॅटोचा गंभीर प्रश्न आज निर्माण झाला आहे." - सचिन होळकर, कृषितज्ज्ञ, लासलगाव

Food Processing
Namami Goda Project : प्रशासकीय गटांगळ्यात अडकला प्रकल्प; प्रकल्पाचे बजेट वाढले तब्बल 1 हजार कोटींनी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com