Food Processing Industry
sakal
नाशिक
Nashik News : अन्नप्रक्रिया क्षेत्रात नाशिकची मोठी झेप; आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याचे केंद्रीय सचिवांचे आवाहन
NIMA Workshop Focuses on Food Irradiation and Testing Technologies : नाशिकमधील निमा सभागृहात आयोजित अन्नप्रक्रिया क्षेत्रावरील कार्यशाळेत केंद्र सरकार, अणुऊर्जा विभाग, संशोधन संस्था व उद्योग प्रतिनिधी सहभागी झाले होते. अन्न सुरक्षितता, किरणीकरण तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सातपूर: अन्नप्रक्रिया क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणे, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून, यासाठी उपलब्ध विविध योजनांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भारत सरकारच्या अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे संयुक्त सचिव डॉ. रणजित सिंह यांनी केले.
