Sakal Exclusive : रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! जनरल डब्यातील प्रवाशांना मिळणार 'इतक्या' किंमतीत जेवण...

For passengers in General compartment in railway Food for just Rs 20 50 nashik news
For passengers in General compartment in railway Food for just Rs 20 50 nashik newsesakal

Sakal Exclusive : रेल्वे प्रवाशांसाठी एक खूशखबर असून, आता रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अगदी माफक दरात जेवण दिले जाणार आहे.

मध्य रेल्वेच्या पुणे, लोकमान्य टिळक टर्मिनस, मनमाड, भुसावळ, खंडवा व नागपूर या सहा रेल्वे स्थानकांवर प्रायोगिक तत्त्वावर ही नवी योजना सुरू करण्यात आली.

रेल्वेस्थानकावर उभ्या असलेल्या प्रवासी गाड्यांच्या जनरल डब्याजवळ स्टॉल लावण्यात आले असून, २० आणि ५० रुपयांत जेवण उपलब्ध करून देण्यात आले आहे. (For passengers in General compartment in railway Food for just Rs 20 50 nashik news)

भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी आहे. रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची खाण्या-पिण्याची अडचण दूर होईल. रेल्वेस्थानकाच्या फलाटावर जनरल डब्यासमोरच ‘इकॉनॉमी मॉल’ स्टॉल लावण्यात आले आहेत. या स्टॉल्सवर २० रुपयांत जेवण आणि तीन रुपयांत पाणी देण्यात येत आहे.

स्टॉल्सच्या माध्यमातून प्रवाशांना स्वस्त जेवण उपलब्ध करून देण्याची ही योजना आहे. हे स्टॉल जनरल डब्यासमोर लावण्यात आले असल्याने रेल्वे गाडी एखाद्या स्थानकावर थांबल्यावर जेवणासाठी फार दूरवर जाण्याची गरज भासणार नाही.

रेल्वेस्थानकांवर जनरल डबे ज्या ठिकाणी थांबतील, त्याच ठिकाणी हे स्टॉल्स उभारले जात आहेत. प्रवाशांना रेल्वेतून उतरून फारसं लांब जावं लागू नये, अशीच व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

For passengers in General compartment in railway Food for just Rs 20 50 nashik news
SAKAL Exclusive: प्रायोगिक नाटकांवर महिला विषयांची छाप! नाट्य संस्थांकडून नवनवीन, हटके प्रयोग

फक्त २० रुपयांत जेवण...

जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खाण्या-पिण्याबाबत समस्यांना सामोरे जावे लागते. खाद्यपदार्थ सहज उपलब्ध न झाल्याने प्रवाशांना चांगल्या दर्जाचं जेवण मिळत नाही. अशा परिस्थितीत स्वस्त दरात जेवण आणि पाणी उपलब्ध करून देण्याची योजना रेल्वेने आखली.

प्रवाशांना फक्त २० रुपयांत पोटभर जेवण मिळणार आहे. २० रुपयांत प्रवाशांना ‘इकॉनॉमी फूड’ मिळेल. ज्यात सात पुऱ्या (१७५ ग्रॅम), बटाट्याची भाजी (१५० ग्रॅम) आणि लोणचे (१२ ग्रॅम) या पदार्थांचा समावेश आहे.

५० रुपयांत अल्पोपहार....

रेल्वेकडून सुरू केल्या जाणाऱ्या या स्टॉलवर केवळ पुरीच नाही, तर राजमा चावल, मसाला डोसा, कुल्चे यांसारखे पदार्थही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

For passengers in General compartment in railway Food for just Rs 20 50 nashik news
Voter Registration Campaign : आजपासून घरोघर जाऊन मतदार नोंदणी; निर्दोष याद्यांसाठी राजकीय पक्षांनाही आवाहन

राजमा चावल किंवा छोले चावल, खिचडी, कुल्चे, छोले-भटुरे, पावभाजी आणि मसाला डोसा यांसारखे स्नॅक्स केवळ ५० रुपयांत प्रवाशांना उपलब्ध करून दिले जात आहे. ३५० ग्रॅमपर्यंत यापैकी कोणतीही वस्तू ५० रुपयांना घेता येते. रेल्वेने आयआरसीटीसी झोनला प्रवाशांना पॅकबंद पाणी तीन रुपयांत दिले जात आहे.

सहा स्थानकांवर प्रायोगिक तत्त्वावर योजना सुरू

स्वस्त दरात जेवण उपलब्ध करून देण्याची योजना सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सहा रेल्वेस्थानकांची निवड करून सहा महिन्यांसाठी ही सेवा सुरू केली आहे. त्यानंतर ही सेवा इतर रेल्वेस्थानकांवर सुरू केली जाईल. मध्य रेल्वेच्या पुणे, लोकमान्य टिळक टर्मिनस, मनमाड, भुसावळ, खंडवा व नागपूर या स्थानकांवर स्वस्त जेवणाचे स्टॉल सुरू करण्यात आले आहेत.

For passengers in General compartment in railway Food for just Rs 20 50 nashik news
Saptashrungi Devi Gad : इर्शाळवाडीच्या घटनेने सप्तशृंगगडावर चिंतेचे वातावरण; धोकेदायक भागाबाबत नागरिक भयभीत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com