esakal | मालेगावात सलग दुसऱ्या वर्षी ईदगाह मैदानावर नमाजपठणाला प्रतिबंध
sakal

बोलून बातमी शोधा

sachin patil

मालेगावात सलग दुसऱ्या वर्षी ईदगाह मैदानावर नमाजपठणाला प्रतिबंध

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : कोरोना संसर्ग (coronavirus) वाढत आहे. या बिकट काळात थोडासा गाफील व निष्काळजीपणाही जिवावर बेतण्याची शक्यता आहे. त्यामुळे रमजानसारखा (Ramadan) महत्त्वाचा सण असला तरी सामाजिक अंतर पाळा (social distancing), मास्क वापरा (mask), वारंवार हात धुवा (hand wash), शासन प्रतिबंधांचे काटेकोर पालन करतानाच रमजान ईदचे (Eid) नमाजपठण घरीच करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले.(there is no mass prayer to this Ramadan Eid at Eidgah Maidan due to corona)

व्यवसायाला परवानगी द्या

सलग दोन वर्षे कोरोनामुळे महत्त्वाच्या सण कालावधीत व्यवसाय ठप्प झाला आहे. यामुळे व्यावसायिकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. पश्‍चिम भागात निर्बंधांचे सक्तीने पालन केले जाते. पूर्व भागात अनेक ठिकाणी सर्रास दुकाने व व्यवहार सुरू आहेत. यातून जनमानसात वेगळा संदेश जातो. रमजान ईद सणापूर्वी शेवटचे आठ दिवस सर्वच व्यावसायिकांना काही कालावधीसाठी व्यवसाय करण्यास संमती द्यावी, अशी मागणी व्यापारी महासंघाने पाटील व खांडवी यांच्याकडे केली. या संदर्भात जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढू, असे आश्‍वासन पाटील यांनी दिले.

हेही वाचा: मराठा आरक्षण रद्द : नाशिकमधून राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया, पाहा VIDEO

सलग दुसऱ्या वर्षी सामूहिक नमाजपठण नाही

रमाजन ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिस नियंत्रण आवारातील सुसंवाद हॉलमध्ये झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधीक्षक लता दोंदे, प्रताप जाधव, शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते. खांडवी यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचना, कोरोना प्रतिबंधक नियम याविषयी माहिती दिली. बैठकीत रामा मिस्तरी, युसूफ इलियास, प्रमोद शुक्ला, केवळ हिरे, रफीक अहमद आदींसह समितीच्या विविध सदस्यांनी वेगवेगळ्या सूचना केल्या. वाढत्या कोरोना संसर्गामुळे सलग दुसऱ्या वर्षी कॅम्प रस्त्यावरील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाजपठण होणार नाही. छावणी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण वाडिले यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

हेही वाचा: Coronavirus : दम्याचा त्रास आहे? मग घ्या विशेष काळजी