Coronavirus : दम्याचा त्रास आहे? मग घ्या विशेष काळजी

दमा आणि कोविड १९ ची काही लक्षणे सारखी असल्यामुळे वेळीच तपासणी करा
Winter Asthma
Winter Asthma

सर्वत्र धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूची (covid 19) सामान्य लक्षणं साऱ्यांनाच ठावूक आहेत. ताप,सर्दी,खोकला, घशात खवखव होणे ही कोरोनाची प्रमुख लक्षणं मानली जातात. परंतु, आता पाठदुखी, डोकेदुखी, उलट्या होणं, दम लागणे, घशात खवखव आणि सर्दी होणे अशी अनेक लक्षणे कोविड-१९ च्या दुस-या लाटेमध्ये दिसू लागली आहेत. विशेष म्हणजे दम्याच्या (asthma ) आजारामध्येही अशीच काही अंशी लक्षणं जाणवतात. त्यामुळे सध्या लोक कोरोना (covid 19) व दमा (asthma) या दोन्ही आजारातील लक्षणांमध्ये गैरसमज करुन घेत आहेत. म्हणूनच, दम्याच्या रूग्णांनी या काळात विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचा सल्ला डाँक्टरांनी जागतिक अस्थमा दिनानिमित्त दिला आहे. (covid 19 asthma patients precaution measure tips)

‘‘कोरोना आणि दमा हे दोन्ही आजार प्रथम फुफ्फुसावर आघात करतात, हे सत्य आहे. साधारणतः पावसाळ्यात सुरूवातीला ढगाळ वातावरण आणि दमट हवामानामुळे हवा अशुद्ध असल्याने दम्यांचे विकार अनेकांमध्ये दिसून येतात. त्यातच दम्याचा विकार असणाऱ्यांना या कालावधीत अधिक त्रास जाणवतो. अशावेळी श्वसननलिकेला आतमध्ये सूज येते आणि ती आकुंचन पावते. परंतु, योग्य उपचार झाल्यास श्वसननलिका पुन्हा पुर्वस्थितीत येऊ शकते. याशिवाय कोरोना संसर्ग झाल्याचे वेळीच निदान व उपचार न झाल्यास विविध आजार होण्याची शक्यता अधिकच बळावते. त्यातच मधुमेह नियंत्रणात न राहिल्यास त्याचा फुप्फुसाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. फुफ्फुसाचे कार्य बिघडल्यास श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळेच दम्याचा विकार असणाऱ्यांना या कोरोना काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचं आहे’’, असे पुण्यातील अपोलो क्लिनिकचे डॉ. विशाल रमेश मोरे म्हणाले.

Winter Asthma
बापरे! एका पाईप दुरुस्तीचं बिल चक्क ४ लाख

पुढे ते म्हणतात, ‘‘दमा आणि कोरोना या दोन्ही आजारांची लक्षणे सारखीच आहेत. दम्याच्या आजारावर योग्य पद्धतीने उपचार सुरू असतील तर तुम्हाला कोरोना होण्याची शक्यता फार कमी असते. परंतु, काळजी न घेतल्यास दम्याच्या रूग्णांना कोरोना संसर्गाचा धोका हा इतरांपेक्षा जास्त असतो. फुफ्फुसात संसर्ग झाल्यास तापही येऊ शकतो. म्हणून कोणतीही लक्षणे दिसल्यास दम्याच्या रूग्णांनी तातडीने डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. न्यूमोनिया झालेला असल्यास कोविड-१९ ची चाचणी करून घ्यावी. नेहमीच्या औषधांनीही दम्याचा त्रास कमी होत नसेल तर तो कोविड-१९ असू शकतो. त्यामुळे अशा रूग्णांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावेत. बाहेरून घरात आल्यावर आंघोळ करावी आणि कपडे धुवायला टाकावेत. घरात ज्या ठिकाणी तुम्ही स्पर्श केलाय ती जागा सॅनिटाईज करून घ्यावी. दम्याची औषधे योग्य पद्धतीने घेणेही गरजेचं आहे. जर तरीही कुठलीही लक्षणे आढळून आल्यास आपल्या छातीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. यामुळे दम्याच्या रूग्णांना कोरोना संसर्गाचा धोका कमी होतो आणि त्यांचा दमाही नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.’’

"दम्याच्या रूग्णांकडून आम्हाला अनेक कॉल्स येतात ज्यामध्ये रुग्णांना कोविड १९ सारखीच लक्षणे दिसून येतात. हे रुग्ण मानसिक आणि भावनिकदृष्ट्या खचून जात असल्याने त्यांनी पुरेशी विश्रांती घेणे, ध्यान-धारणा करणे आवश्यक आहे. दम्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. म्हणून जर जवळील व्यक्तीला दम्याचा त्रास असेल तर त्या व्यक्तीची लक्षणे, त्यांना होणारा त्रास याची वेळोवळी नोंद ठेवा. त्यांना लागणा-या औषधांची यादी देखील नियमितपणे सोबत ठेवा. तपासणीकरिता जाताना देखील या व्यक्तींच्या सोबत रहा. घरच्या घरी व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. परिस्थिती नियंत्रणात नाही असे वाटल्यास डॉक्टरांना फोन करा", असं अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयातील जनरल फिजिशीयन डॉ.संजय नगरकर यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com