वीस वर्षांपूर्वीची उपग्रह छायाचित्रे उपलब्ध होणार

वीस वर्षांपूर्वीची उपग्रह छायाचित्रे उपलब्ध होणार
Published on: 
वनहक्क दावे पडताळणी प्रकरणांना गती वीस वर्षांपूर्वीची उपग्रह छायाचित्रे उपलब्ध होणार सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १९ : जिल्ह्यातील वनहक्क दाव्यांच्या पडताळणीची प्रक्रिया अधिक अचूक, वस्तुनिष्ठ आणि प्रभावी करण्यासाठी सन २००५ या कालावधीतील उपग्रह छायाचित्रे सामूहिकरीत्या उपलब्ध करून घेण्यात येणार आहेत. या छायाचित्रांच्या माध्यमातून संबंधित कालावधीतील जमिनीची स्थिती, वापर आणि भौगोलिक परिस्थिती यांची पडताळणी करण्यास मदत होणार असून, वनहक्क दाव्यांशी संबंधित अपील प्रकरणे तसेच क्षेत्र पडताळणीच्या कामासाठी त्यांचा उपयोग केला जाणार आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली १६ लाख रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली आहे. संबंधित उपग्रह छायाचित्रे एमआर सॅटकडून प्राप्त करून घेण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यातील संबंधित प्रकरणांसाठी ही छायाचित्रे सामूहिकरीत्या उपलब्ध करून घेण्यात येणार असल्याने आवश्यक संदर्भ व माहिती एकत्रित स्वरूपात मिळण्यास मदत होईल. वनहक्क दाव्यांशी संबंधित अपील प्रकरणांमध्ये उपलब्ध कागदपत्रे, महसुली अभिलेख, प्रत्यक्ष क्षेत्राची माहिती आणि इतर संबंधित पुराव्यांचा विचार करावा लागतो. उपग्रह छायाचित्रांच्या मदतीने संबंधित क्षेत्राच्या भौगोलिक स्थितीचा अभ्यास करता येऊ शकतो. त्यामुळे दाव्यांची छाननी करताना संबंधित अधिकाऱ्यांना पूरक माहिती उपलब्ध होईल. तसेच, क्षेत्र पडताळणीशी संबंधित प्रकरणांमध्ये आवश्यक संदर्भ तपासण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील वनहक्क दाव्यांच्या कामकाजात तांत्रिक माहितीचा प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल. मंजूर निधीतून उपग्रह छायाचित्रे उपलब्ध करून घेतल्यावर त्यांचा वापर संबंधित दाव्यांची पडताळणी, अपील प्रकरणांचा अभ्यास आणि क्षेत्रविषयक माहितीची तपासणी यासाठी करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com