नाशिक- लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील वरिष्ठ लिपिक असलेल्या आरोपीने कनिष्ठ लिपिकपदी असलेल्या महिला कर्मचाऱ्याशी अश्लील संवाद साधत त्यांना मानसिक त्रास दिल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. दरम्यान, आरोपी सध्या नाशिक न्यायालयातच वकिली करतो.