
नाशिक : ऑनलाइन गंडविलेले ४० हजार परत
नाशिक : सायबर गुन्हेगाराने फसविलेल्या महिलेला ३९ हजार ९९९ रुपये परत करून सायबर विभागाला यश आले. पेटीएम केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर गुन्हेगाराने गंडविलेल्या पीडित तक्रारदाराला बुधवारी (ता. २९) पोलिसांकडून मुद्देमालाची रक्कम परत मिळवून दिली.१४ फेब्रुवारी २०२० ला पेटीएम केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर गुन्हेगाराने तक्रारदार सुजाता उमेश कर्डिले यांना क्विक सपोर्ट हे रिमोट ॲक्सेस ॲप्लिकेशन डाउनलोड करायला सांगून १९ हजार ९९९ रुपयांची फसवणूक केली होती.(cyber department succeeded in returning Rs 39,999 to a woman who was cheated by a cyber criminal)
हेही वाचा: कोल्हापूर : पावणे चारशे 'पोलिसांना' मिळणार बढती
श्रीमती कर्डिले यांच्याप्रमाणेच आणखी २६ जणांना सायबर गुन्हेगारांनी गंडविले होते. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना, कॅनरा बँकेतील पैसे पंजाब नॅशनल बँकेत वर्ग झाल्याचे पुढे आले. त्यावरून पोलिसांनी पैसे वर्ग झालेल्या बेंगळुरू येथील पंजाब नॅशनल बँकेच्या ज्या खात्यात पैसे जमा झाले, त्या खातेदाराचा शोध घेतला. सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दानिश मन्सुरी, संदीप बोराडे यांनी संबंधित खाते गोठविले. त्यातील ५९ हजारांची रक्कम होल्ड करून ठेवण्यासाठी बँकेकडे पाठपुरावा केला. त्यातील तक्रारदार श्रीमती कर्डिले यांचा ३९ हजार ९९९ रुपयांचा रकमेचा धनादेश बुधवारी वरिष्ठ निरीक्षक सूरज बिजली यांच्या उपस्थितीत तक्रारदाराला सुपूर्द करण्यात आला.
फोनवर अज्ञात व्यक्तीकडून खातेदारांना केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने ओटीपीसह संवेदनशील माहिती मागून फसविण्याचे प्रकार उजेडात येत आहेत. त्यामुळे संवेदनशील माहिती फोनवरून कुणाला देऊ नये.
-सूरज बिजली, वरिष्ठ निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे
Web Title: Forty Thousand Returned Online Fraud
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..