Nashik Accident News: शहरात विविध अपघातांत चौघांचे मृत्यू

accident
accidentsakal
Updated on

नाशिक : शहर परिसरात वेगवेगळ्या अपघातात ३ पादचाऱ्यांसह चौघांचे मृत्यू झाले. आहे. नांदूर नाका भागातील भाऊसाहेब उद्धव साळुंके (३१, मुळ रा. गोलटगाव ता. जि. संभाजीनगर हल्ली जनार्दननगर, नांदूर नाका) यांना २७ नोव्हेंबरला संत जनार्दन स्वामी पूल परिसरात पाठीमागून भरधाव कारने (एमएच- १४- केएस- ९९७५) जोरदार धडक दिली होती.

या अपघातात साळुंके यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी संतोष सराटे (रा. मखमलाबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात कारचालकाविरुद्ध आडगाव पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Four killed in various accidents in city Nashik News)

दुसरा अपघात पाथर्डी शिवारात झाला. सर्व्हीस रोड ओलांडणाऱ्याया ४५ वर्षीय अनोळखी इसमास भरधाव वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. गुरुवारी (ता.३०) सायंकाळी झालेल्या अपघातात मृत्यू झालेला व्यक्ती फिरस्ता असल्याचे सांगण्यात आले.

याबाबत पोलिस कर्मचारी पंकज शिरवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरा प्रकार महामार्गावरील सुमन पेट्रोलपंप भागात उघडकीस आला.

निवृत्ती दादाभाऊ घाटेसाव (३८ रा. भगतसिंगनगर, अल्को मार्केट इंदिरानगर) हे शनिवारी (ता. २) रात्री रस्त्याने पायी जात असताना भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली.

या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने भाऊ प्रदिप घाटेसाव यांनी त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयमार्फत आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल केले. उपचार सुरू असताना डॉ. वृषभ आडके यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

accident
Accident News: दिंडीत कंटेनर घुसल्याने अपघात; ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू तर ८ वारकरी जखमी

याबाबत डॉ. आर. जे. शिराळे यांनी दिलेल्या खबरीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चौथा अपघात सिन्नर फाटा भागात झाला.

सामनगाव येथील गंगाधर रूंजा जाधव (६० रा. जाधव वस्ती, साडेगाव) हे रविवारी (ता. ३) दुपारी प्रवास करीत असताना गावठाण वृद्धाश्रमाजवळ अचानक डुक्कर आडवे आल्याने ते पडले होते.

या घटनेत त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने मुलगा पप्पू जाधव याने त्यांना तातडीने साई केअर हॉस्पिटल येथे दाखल केले असता, सायंकाळी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याबाबत नाशिक रोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

accident
Pune School Bus Accident : पुण्यात स्कूल बसचा भीषण अपघात! सीसीटीव्ही फुटेज आलं समोर; चालकावर गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com