Nashik Fraud Crime : अंबडला कंपनीच्या भागीदाराकडूनच फसवणूक

Crime
Crimeesakal

Nashik Fraud Crime : बनावट दस्तऐवज तयार करून स्वतःच्या फायद्यासाठी गैरव्यवहार करीत बँकेतून वेळोवेळी रक्कम काढून घेत कंपनीतील भागीदाराची फसवणूक (Fraud) करण्यात आली. या प्रकरणी भागीदारासह दोघांविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Fraud by partner of company itself in ambad nashik fraud crime)

तुषार नारायण चिमणपुरे (वय ३६, रा. अनमोल नयनतारा, नाशिक) व भूषण जी. कोतकर (३२, रा. भास्कर भागीरथी, तिडके कॉलनी, नाशिक) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम राजेश डिक्कर (वसुंधरा हाइट्स, प्रशांतनगर, पाथर्डी फाटा) यांनी फिर्याद दिली आहे.

डिक्कर यांची अंबड एमआयडीसीमध्ये ग्रॉफिट्रॉडस प्रा. लि. कंपनी आहे. या कंपनीत डिक्कर व चिमणपुरे यांची भागीदारी होती. काही रक्कम देऊन या कंपनीचे कामकाज पाहण्यासाठी डिक्कर यांनी चिमणपुरे यांना मंजुरी दिली होती, मात्र ठरलेली रक्कम न देता चिमणपुरे यांनी कंपनीचे कामकाज चालू ठेवले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Crime
Nashik Crime News : बाहेरगावी कामाला येण्यास दिला नकार अन् रागात पतीने केला पत्नीचा खून

दरम्यान चिमणपुरे व भूषण कोतकर यांनी संगनमत करून डिक्कर यांची खोटी सही करून खोटा दस्तऐवज तयार केला. त्याद्वारे स्वतःच्या फायद्यासाठी बँकेतून वेळोवेळी रक्कम काढून घेत डिक्कर यांचे आर्थिक नुकसान केले. हा प्रकार २६ फेब्रुवारी २०२० ते ११ मे २०२२ दरम्यान घडला. ही बाब लक्षात आल्यानंतर डिक्कर यांनी अंबड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणाचा तपास अंबड पोलिस करत आहेत.

Crime
Nashik Crime News : 1 वर्षीय बालिकेचा बेवारस मृतदेह आढळला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com