Latest Crime News | पोलिस असल्याची बतावणी करून गंडविणाऱ्यास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Fake Police Fraud : पोलिस असल्याची बतावणी करून गंडविणाऱ्यास अटक

नाशिक : वयोवृद्धांना हेरून पोलिस असल्याची बतावणी करून, दागिने घालून फिरू नका, असे सांगत हातचलाखी करून हातोहात दागिने लंपास करणाऱ्या इराणी टोळीतील एका संशयिताला मालेगावातून अटक करण्यात आले. शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने त्याच्याकडून दोन लाखांचे सोने हस्तगत केले. (Fraud by pretending to be police arrested at malegaon Nashik Latest Crime News)

हेही वाचा: Nashik : तब्बल 11 वर्षानंतर निवृत्त मुख्याध्यापिकेला न्याय!

सादिक अली राहत अली सय्यद (५८, रा. दरेगाव शिवार, मालेगाव), असे संशयिताचे नाव आहे. १७ ऑगस्ट २०२२ रोजी दोन जणांनी जेल रोडवरील लोखंडे मळा भागातील चंद्रप्रकाश बंगल्या शेजारून जाणाऱ्या वृद्धाला संशयितांनी पोलिस असल्याची बतावणी करून त्याच्या हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या हातचलाखीने काढून पोबारा केला होता. याप्रकरणी उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल होता.

गुन्ह्याचा युनिट एककडून समांतर तपास सरू असताना युनिट एकचे अंमलदार प्रवीण वाघमारे यांना संशयित मालेगावात असल्याची माहिती खबर मिळाली होती. सदर बाब वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांना दिल्यानंतर, त्यांच्या सूचनेनुसार पथक मालेगावात पोचले. दरेगाव शिवारातून संशयिताला पथकाने सापळा रचून अटक केली. पोलिस चौकशीत त्याने पोलिस असल्याची बतावणी करून तीन फसवणूक केल्याचे कबुली दिली.

तपासात तीन गुन्ह्यातील २ लाख २२ हजार ५०० रुपयांचे ५० ग्रॅम सोने हस्तगत केले आहे. पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त (गुन्हे) संजय बारकुंड, आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली विजय ढमाळ, उपनिरीक्षक विष्णू उगले, अंमलदार रवींद्र बागूल, प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, नाजीम पठाण, आसिफ तांबोळी, प्रशांत मरकड, महेश साळुंके यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा: Nashik Crime News : 11 लाखांचा मद्यसाठा जप्त; जायखेडा पोलिसांची कारवाई