नाशिक- उत्तराखंडातील व्यापाऱ्यास भगूर परिसरातील मक्याची शेती दाखवून मका पुरवठा करण्याचे सांगत त्यांच्याकडून साडेअकरा लाख रुपये घेतले. परंतु मक्याचा पुरवठा न करता परप्रांतीय व्यापाऱ्याची फसवणूक केली. याप्रकरणी नैनिताल येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तो शून्य क्रमांकाने देवळाली कॅम्प पोलिसात वर्ग झाला आहे. पंचवटीतील संशयित व्यापाऱ्याचा पोलिस शोध घेत आहेत.