
बिटकॉईनच्या नावावर ठेवी घेतल्याचे भासवून पाऊणेतीन लाखाची फसवणूक
मालेगाव (जि. नाशिक) : बिटकॉईनच्या (Bitcoin) नावावर ठेवी घेतल्याचे भासवून चिंचगव्हाण (ता. मालेगाव) येथील मंगेश मांडवडे (३२, हल्ली रा. आदर्श नगर, नाशिक) या तरुणाची पाऊणेतीन लाख रुपयांची फसवणूक (Fraud) झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याच पध्दतीने सुरत, सापुतारा व नाशिक यासह वेगवेगळ्या ठिकाणी सेमीनार घेऊन तिघा संशयितांनी अनेकांना प्लॅटिमा अल्टीमा हा क्रिप्टो कॉईन व फॉर्म घेऊन फसविल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे.
तालुका पोलिस ठाण्यात या प्रकरणी फसवणूक व राज्य ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमान्वये तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. यात एका परदेशी नागरीकाचा समावेश आहे. (Fraud of 2 lakh 75 thousand by pretending to take deposits in Bitcoin nashik latest crime marathi news)
हेही वाचा: शहरात बेकायदा वीज जोडणीमुळे अतिक्रमणाला प्रोत्साहन; मनपा गुन्हा दाखल करणार
श्री. मांडवडे याच्याशी राजेंद्र उपाध्याय, योगेश भालेराव व ॲलेक्स (रा. जर्मनी) यांनी प्रत्यक्ष व झुम मिटींगद्वारे संपर्क साधला. त्यानंतर त्याचा विश्वास संपादन करुन चिंचगव्हाण व नाशिक येथुन दोन वेळा दोन लाख ७५ हजार रुपये रोख रक्कम घेतली. डिसेंबर २०२१ ते ८ जुलै २०२२ दरम्यान चिंचगव्हाण येथे हा प्रकार घडला.
रक्कमेपोटी महिन्याला कमीत कमी दहा टक्के परतावा मिळेल असे खोटे आश्वासन त्यांनी दिले. तसेच मांडवडेच्या मोबाईलमध्ये रजिस्टर केल्याचे दाखवून प्लॅटिमा, अल्टीमा, बिटकाईन फिर्यादीच्या नावावर घेतल्याचे भासवून ठेवी स्विकारुन फसवणूक केली.
प्रत्यक्षात मांडवडे यांना कुठलीही रक्कम परत केली नाही. या संशयितांनी वेगवेगळ्या ठिकाणी सेमीनार घेत भारतीय रुपयाऐवजी डॉलर, युरो या विदेशी चलनात बेकायदेशीर गुंतवणूक करुन फसवणूक केल्याचे म्हटले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत पाटील तपास करीत आहेत.
हेही वाचा: NMC Election : OBCसाठी 36 जागा राखीव
Web Title: Fraud Of 2 Lakh 75 Thousand By Pretending To Take Deposits In Bitcoin Nashik Latest Crime Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..