Fraud Crime News
Fraud Crime Newsesakal

Bank Slip भरण्याच्या बहाण्याने तरुणाची फसवणूक; 40 हजार लंपास

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील स्टेट बँक चौकातील सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये आलेल्या दोघा भामट्यांनी तरुणाला आम्हाला स्लीप भरता येत नाही. बँकेतून पैसे काढण्याची स्लीप भरुन दे, असा बहाणा करीत स्लीप भरुन देण्यासाठी मदत करणाऱ्या तरुणाकडीलच ४० हजार रुपये सराईतपणे लंपास केले. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये बुधवारी (ता. २१) हा प्रकार घडला.

येथील पेढीचे मालक रमेश चौधरी यांनी त्यांच्याकडील कर्मचारी सागर पाटील (वय ३२, रा. मिराबाई हॉसिंग सोसायटी, कलेक्टरपट्टा) याला ४० हजाराचा धनादेश देऊन बँकेतून पैसे काढण्यासाठी पाठविले. सागर धनादेश वटवून ४० हजार रुपये घेऊन बँकेतून बाहेर पडत असतानाच बँकेच्या प्रवेशद्वारात त्याला चॉकलेटी रंगाचे शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट तसेच, निळ्या रंगाचा शर्ट व जीन्स पॅन्ट परिधान केलेले दाढीधारी दोघेजण भेटले.(Fraud of 40 thousand youth on pretext of paying Bank Slip Nashik Latest Crime News)

Fraud Crime News
Anti Motorcycle Theft Squad : संशयितासह 10 दुचाकी जप्त

त्यांनी आम्हाला बँकेत पैसे भरायचे आहेत. स्लीप भरता येत नाही असे सांगून सागरला बँक स्लीप भरण्यास सांगितले. सागरने स्लीप भरताना त्यांना नाव व अकाऊंट नंबर विचारला. संशयिताने दिलीप त्र्यंबक उपाध्याय असे नाव सांगितले. अकाऊंट नंबर विचारला असता नंबर माहित नाही. घेऊन येतो असे सांगून त्याच्याजवळील पैसे ठेवलेले भासतील अशी प्लॅस्टिक पिशवी सागरजवळ दिली. या दरम्यान दोघांनी सागरच्या खिशातील ४० हजार रुपये सफाईदारपणे लंपास केले.

प्रतिक्षा करुनही दोघे संशयित न आल्याने सागरने खिसा पाहिला असता पैसे गायब झाल्याचे लक्षात आले. संशयितांनी सागरजवळ दिलेली पैशांची पिशवी पाहिली असता त्यात नोटांच्या आकाराच्या कागदाचा गठ्ठा दिसून आला. बँकेतील सीसीटीव्हीमध्ये संशयितांचे चेहरे काही प्रमाणात आले आहेत. सागर पाटीलच्या तक्रारींवरुन दोघा संशयितांविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात ठकबाजी व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Fraud Crime News
कुत्ता गोळीसह नशेचा बाजार गरम; तरुणांच्या नशेखोरीमुळे गुन्हेगारीत वाढ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com