Anti Motorcycle Theft Squad : संशयितासह 10 दुचाकी जप्त

Bikes seized from the suspect by the Anti-Motorcycle Theft Squad
Bikes seized from the suspect by the Anti-Motorcycle Theft Squadesakal
Updated on

जुने नाशिक : पोलिस आयुक्तालयाच्या ॲन्टी मोटरसायकल थेप्ट परिमंडळ १ च्या विशेष पथकाने मालेगाव येथील संशयितास डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीच्या १० दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. अलताब अली अस्लम अली (१९, रा. नजमाबद मालेगाव) असे संशयिताचे नाव आहे. (Anti Motorcycle Theft Squad Seized 10 bikes with suspect Nashik Crime Latest Marathi News)

Bikes seized from the suspect by the Anti-Motorcycle Theft Squad
Nashik : भुजबळांनी MVP संस्थेस दिली 5 लाखांची देणगी

पथकाने ही मोठी कारवाई केली. संशयित अलताब अली अस्लम अली मुंबई- आग्रा रोडवरील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय परिसरात चोरीची दुचाकी घेऊन येत असल्याची गुप्त माहिती पथकास मिळाली. पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित सोनवणे, कर्मचारी प्रभाकर सोनवणे, संतोष पवार, अनिल आव्हाड, इरफान शेख, तुळशीदास चौधरी, विश्वजीत राणे, संदीप रसाळ, श्रीकृष्ण पडोळ, गोरक्ष साबळे, शिवाजी मुंजाळ, तुकाराम कुंभार आदींनी डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय परिसरात सापळा रचून त्यास ताब्यात घेतले.

चौकशी दरम्यान त्याने त्याचे सहकारी भुऱ्या ऊर्फ नूर महम्मद शहा, याकूब नुरा अरमान ऊर्फ मुज्जू खान नासिर खान यांच्या मदतीने मुंबई, नाशिक अशा विविध ठिकाणाहून चोरी केलेल्या १० दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. पंचवटी पोलिस ठाण्यातील एक, ठाणे मुंबई येथील दोन, तसेच मुंबई शहर एक असे गुन्हे उघडकीस आले.

Bikes seized from the suspect by the Anti-Motorcycle Theft Squad
बेघरांसाठी NMCचे निवारा घर; 894 बेघर लाभार्थ्यांची नोंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Chhagan Bhujbal on Nashik road potholes
Nashik Pothole Issue
Nashik Weather Alert Saptashrungi Gad Nanduri Ghat Closed for Traffic Due to Heavy Rain and Strong Winds
The former Zilla Parishad school student has become an inspiration for rural and tribal students across Maharashtra.
Marathi News Esakal
www.esakal.com