नाशिक : रेल्वेत नोकरी लावतो सांगत 6 लाखाला गंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fraud Case News

नाशिक : रेल्वेत नोकरी लावतो सांगत 6 लाखाला गंडा

ओझर (जि. नाशिक) : येथील बांधकाम व्यावसायिकाच्या (Builder) मुलीस रेल्वेमध्ये थेट नोकरीस (Railway Job) लावून देतो, असे सांगत वेळोवेळी बँकेतून सहा लाख रुपये घेऊन रेल्वेचे बनावट नियुक्तीपत्र (Fake Appointment Letter) व कागदपत्रे देऊन फसवणूक (Fraud) केल्याची तक्रार ओझर पोलिसांत दाखल झाली. (fraud of 6 lakhs by fake appointment letter of Railway Job at ozar Nashik News)

फेब्रुवारी २०२२ पासून ते आजपर्यंत भावसिंग सांळुके (रा. ओझर) यांची सिंग साहेब व त्याचे इतर सहकारी (पूर्ण नाव व पत्ता समजू शकला नाही) यांनी संगनमत करून साळुंके यांच्या मुलीस रेल्वेमध्ये नोकरीस लावून देतो, असे खोटे सांगून वेळोवेळी बंधन बँक लिमिटेड व आयडीबीआय बँकेतून गौतमकुमार नावाने सहा लाख रुपये घेऊन साळुंके यांच्या मुलीच्या नावे भारतीय रेल्वेचे बनावट नियुक्तीपत्र व इतर कागदपत्रे देवून फसवणूक केल्याची तक्रार साळुंके यांनी ओझर पोलिसांत नोंदविल्यावरून ओझर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.