Sand
sakal
नाशिक: राज्य सरकारच्या मोफत वाळू धोरणांतर्गत जिल्ह्यातील शासकीय घरकुलांसाठी ७६ हजार ब्रास मोफत वाळू वितरित करण्यात येणार आहे. जिल्हा गौणखनिज विभागाने त्यासाठी तयारी केली असून, लाभार्थ्यांना १ ऑक्टोबरपासून वाळू उपलब्ध करून देण्यात येईल. पण, वाळू ठेक्यापासून ते घरकुलापर्यंत वाहतुकीचा खर्चाचा भार उचलावा लागणार असल्याने प्रत्यक्षात ही वाळू न परवडणारी असल्याची भावना लाभार्थ्यांमध्ये आहे.