esakal | 'एसटी'ची आर्थिक स्थिती सुधारणार; आता 25 टक्‍के शासकीय वाहतुक एसटीने

बोलून बातमी शोधा

state transport
'एसटी'ची आर्थिक स्थिती सुधारणार; आता 25 टक्‍के शासकीय वाहतुक एसटीने
sakal_logo
By
अरुण मलानी

नाशिक : कोरोनामुळे जनजीवन विस्कळित झाले असून, याचा प्रतिकूल परिणाम महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळावरही झाला आहे. गत लॉकडाउनमध्ये मालवाहतूक सेवा सुरू केली असून, या सेवेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. याचाच एक भाग म्‍हणून आता शासकीय कार्यालयातील विविध विभागांची खासगी वाहतुकीच्या पंचवीस टक्‍के मालवाहतूक एसटीद्वारे करण्याचा निर्णय जाहीर झाला आहे.

महामंडळाचा तोटा भरून काढणार

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जारी केलेल्‍या लॉकडाउनमुळे गेल्‍यावर्षी एसटीची चाके दीर्घकाळ हलली नव्‍हती. यंदाही कोरोना रुग्‍णांची संख्या वाढत असताना सार्वजनिक वाहतूक व्‍यवस्‍थेवर निर्बंध आणले आहेत. अशा परिस्‍थितीत एसटी महामंडळाला आर्थिक फटका सोसावा लागतो आहे. उत्‍पन्नावर परिणाम झाल्‍याने महामंडळाच्‍या तिजोरीत खडखडाट जाणवू लागला आहे. सध्या केवळ अत्‍यावश्‍यक सेवेतील व्‍यक्‍तींच्‍या वाहतुकीसाठी मोजक्‍या संख्येने बस धावत आहेत. अडचणीच्‍या काळात महामंडळाची आर्थिक परिस्‍थिती सुधरविण्यासाठी राज्‍य मंत्रिमंडळ बैठकीत उपसमिती गठित केली होती. या समितीमार्फत विविध उपाययोजनांवर चर्चा झाली. त्‍यानुसार आता शासकीय कार्यालयांतील विविध विभागांच्‍या खासगी माल वाहतुकीपैकी पंचवीस टक्‍के एसटी महामंडळाच्‍या गाड्यांतून केली जाणार आहे.

हेही वाचा: लस दोनदा घेतली... मी जिवंत आहे बघा!