esakal | ही दोस्ती तुटायची नाय! कोरोनाबाधित मित्राला बरे करूनच आणले घरी
sakal

बोलून बातमी शोधा

friend save friend life

ही दोस्ती तुटायची नाय! कोरोनाबाधित मित्राला बरे करूनच आणले घरी..

sakal_logo
By
रामदास कदम

दिंडोरी (जि.नाशिक) : दिंडोरी तालुक्यात दुसऱ्या लाटेचा मोठा प्रादुर्भाव (corona virus second wave) दिसत आहे. या काळात माणसे दूर गेल्याचे चित्र दिसले. मात्र जऊळके दिंडोरी (dindori) गाव अपवाद आहे. संकटकाळी जो धाऊन येतो तो खरा मित्र (friend) असतो, याची प्रचीती जऊळके दिंडोरी गावात आली. (friend save Corona infected friend)

संकटकाळी जो धाऊन येतो तो खरा मित्र

या गावातील गरीब कुटुंबातील मोलमजुरी करून आपला प्रपंच चालविणारा खंडू गोतरणे कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याची आर्थिक परिस्थिती बरी नसल्याने रुग्णालयाचा खर्च कोण करणार, त्याला दाखल कसे करावे, अशा विवंचनेत असताना त्याच गावातील त्याचा बालपणीचा मित्र तुकाराम जोंधळे यांना ही घटना कळाली. त्यांनीच तत्काळ ओझर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करून त्याचा सर्व खर्च करणार असल्याचे डॉक्टरांना सांगितले. डॉक्टांरानी २६ दिवस उपचार केले. तो त्यातून बरा झाला. त्याचे रुग्णालयाचे एक लाख दहा हजार रुपये बिल जोंधळे यांनी भरले. आता तो बरा होऊन घरी आला आहे.

हेही वाचा: अंत्यसंस्काराचे वेटिंग टळणार; महापालिका करणार स्वतंत्र ॲप विकसित

जगात माणुसकी जिवंत

या जगात माणुसकी जिवंत आहे. तुकाराम जोंधळे यांच्या रूपाने मला खऱ्या अर्थाने परमेश्वर भेटला. याची जाणीव कायम राहील, अशी भावना गोतरणे याने व्यक्त केली.कोरोनाबाधित मित्राला वाचविण्यासाठी मित्राने आर्थिक मदत करत त्याला आधार देत पूर्णपणे बरे करूनच घरी आणले.