नाशिक- दुर्गम-अतिदुर्गम भागात वास्तव्य, घरची आर्थिक परिस्थिती बेताची, शिक्षणाच्या मर्यादित सुविधा, यावर मात करत डॉ. नीतेशलाल कासडेकर परदेशात उच्च शिक्षणाचे धडे गिरावितानाच मोठ्या पगाराची नोकरी करत आहेत. डॉ. कासडेकर यांचा मेळघाट ते अमेरिका असा शैक्षणिक प्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्या प्रयत्नांना आदिवासी विकास विभागाच्या मदतीची जोड मिळाली. त्यामुळे डॉ. कासडेकर यांचे परदेशात उच्च शिक्षणाचे स्वप्न सत्यात उतरले आहे.