Nashik Fruit Market : नाशिकच्या फळबाजारात द्राक्षांचा गोडवा; काळ्या द्राक्षांना २०० रुपये किलोचा दर!

Grape Season Adds Fresh Energy to Nashik Fruit Market : द्राक्ष हंगाम सुरू होताच नाशिकच्या फळबाजारात वर्दळ वाढली असून, उन्हाळ्याची चाहूल लागताच थंडावा देणाऱ्या फळांना मोठी मागणी दिसून येत आहे.
Fruit Market

Fruit Market

sakal 

Updated on

नाशिक: द्राक्षाचा हंगाम सुरू होताच बाजारपेठेत रंगत आली असून, फळांच्या दरांबरोबरच ऋतुबदलाची चाहूलही ठळकपणे जाणवू लागली आहे. थंडीची हळूहळू माघार, वाढता उष्मा आणि बदलते हवामान याचा थेट परिणाम फळबाजारावर दिसून येत आहे. सध्या काळ्या द्राक्षांनी बाजारात आघाडी घेतली असून, त्यांना प्रतिकिलो सुमारे २०० रुपयांचा भाव मिळत आहे. साध्या हिरव्या द्राक्षांनाही मागणी असून, ती १५० रुपये किलोने विकली जात आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com