Onion Crop Crisis : 5 एकरावरील कांद्यावर फिरवला रोटर; लाखोचे नुकसान

Frustrated by defective seeds unseasonal rains and falling price of onion farmer destroyed onion farm
Frustrated by defective seeds unseasonal rains and falling price of onion farmer destroyed onion farm esakal

Nashik News : येथील शेतकरी मुरलीधर पर्वत पगार यांनी सदोष बियाणे, अवकाळी पाऊस व कांद्याचे घसरलेले भाव यांना वैतागून शुक्रवारी (ता.२१) पाच एकर कांद्यावर रोटर फिरवला. (Frustrated by defective seeds unseasonal rains and falling price of onion farmer destroyed onion farm nashik news)

वर्षभराचे पीक वाया गेल्याने त्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे. शासनाने याची दखल घेत तत्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी श्री. पगार यांनी केली आहे.

शेतकरी मुरलीधर पगार यांनी जालना येथून घरगुती कांदा बियाणे आणले होते. या बियाणांपासून तयार केलेल्या कांदा रोपाची बेज (ता. कळवण) शिवारातील गट क्रमांक ४१६, ४१७ १/२ या पाच एकर क्षेत्रावर लागवड केली होती. यासाठी त्यांना जवळपास दोन लाखांचा खर्च आला होता.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Frustrated by defective seeds unseasonal rains and falling price of onion farmer destroyed onion farm
NMC Water Scarcity Plan: 30 पाण्याचे टँकर, 100 बोअरवेल खोदणार! पाणीटंचाई कृती आराखडा विभागीय आयुक्तांना सादर

या कांदा पिकाला पातीवर टोंगळा आल्याने खाली कांदा गळीतही झाली नाही. तसेच निसर्गानेही अवकृपा करीत अवकाळीचा दणका दिल्याने थोडाफार कांदा हातात येण्याची शक्यताही मावळली.त्यामुळे संतापाच्या भरात त्यांनी पाच एकर कांद्यावर ट्रॅक्टरने रोटर फिरवला. यामुळे वर्षभरातील पीक वाया गेले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने या नुकसानीची गंभीर दखल घेऊन आर्थिक मदत द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

"गेल्या वर्षीही कांद्याला कवडीमोल भाव मिळाला होता. त्यातून साधा उत्पादन खर्चही निघाला नव्हता. यंदा स्वतःजवळील जमापुंजी लावून कांदा पिकाची लागवड केली होती. सुरवातीला रोप जोमात होते. मात्र जशी पिकाची वाढ झाली तशी कांदा पातीला टोंगळा दिसायला लागला. त्यामुळे संपूर्ण कांदा पीकच वाया गेले. सद्य:स्थितीत या कांद्याला प्रति क्विंटल तीनशे ते चारशे रुपये मिळत आहे. कांदा काढणीचा खर्चही परवडणारा नसल्याने रोटर मारावा लागला." - मुरलीधर पगार, शेतकरी, कळवण

Frustrated by defective seeds unseasonal rains and falling price of onion farmer destroyed onion farm
Nashik News : महाविकास आघाडीच्या आमदाराला धमकी; चुंभळे पितापुत्रांवर गुन्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com