Nashik Crime : गोळीबार करून दोन महिने फरारी, पाय मोडले तरी पळाला; नाशिकच्या भूषण लोंढेला यूपी मध्ये बेड्या

Long Chase Across Rajasthan, Uttar Pradesh and Nepal Border : प्राणघातक हल्ला आणि गोळीबार प्रकरणी गेल्या दोन महिन्यांपासून फरारी असलेले सराईत गुन्हेगार भूषण प्रकाश लोंढे आणि त्याचा साथीदार प्रिन्स चित्रसेन सिंग यांना नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेजवळ अटक केली.
Crime

Crime

sakal 

Updated on

नाशिक: गेल्या दोन महिन्यांपासून प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात फरारी असलेला सराईत गुन्हेगार व ‘पीएल’ गटातील सराईत गुन्हेगार भूषण प्रकाश लोंढे (३५, रा. स्वारबाबानगर, सातपूर), प्रिन्स चित्रसेन सिंग (३६, रा. गुरुकृपा अपार्टमेंट, जगताप मळा, सिडको) या दोघांना उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेवर अखेर बेड्या ठोकण्यात आल्या. नाशिक शहर गुन्हे शाखेच्या दुसऱ्या युनिटचे पथक गेल्या महिनाभरापासून या दोघांच्या मागावर होते. संशयित राजस्थान ते उत्तर प्रदेश अशा वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य बदलत असल्याने दोन वेळा त्यांनी पोलिसांना चकवा दिला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com