Crime
sakal
मोलमजुरी करणाऱ्या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. लग्न न करताच एकत्र राहत असताना, त्यांच्यात काही कारणातून कुरबूर झाली. त्यामुळे माहेरी आलेल्या प्रेयसीचा खून करून तो पसार झाला. प्रलंबित असलेल्या या गुन्ह्यात तो तब्बल १७ वर्षांनी पोलिसांच्या हाती लागला. विशेषत: पंचवटी पोलिस ठाण्यात तत्कालीन हवालदार असलेले विजय लोंढे यांनी कुशलतेने या गुन्ह्याचा तपास करीत आरोपीला जेरबंद केले. न्यायालयात जलद गतीने खटला चालून अवघ्या काही महिन्यांत आरोपीला जन्मठेपेची शिक्षाही झाली.