Nashik News : बागलाण तालुक्यातील विकास कामांसाठी 22 कोटी 77 लाख रुपयांचा निधी मंजूर

Funds News
Funds Newsesakal

सटाणा (जि. नाशिक) : तालुक्यातील रस्त्यांच्या कामाचा अनुशेष भरून काढण्यासाठी शासनाकडे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत प्रस्तावित केलेल्या सुमारे ३० किलोमीटर लांबी असलेल्या पाच रस्त्यांच्या सुधारणेसाठी २२ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी दिली. (Fund of Rs 22 crore 77 lakh approved for development works in Baglan taluka Nashik News)

आमदार बोरसे म्हणाले, की बागलाण तालुक्यातील काही प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाल्याने दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला होता. या रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी आपण वेळोवेळी मागणी केली होती. त्यानुसार भंडारपाडे - वनोली - चौंधाणे फाटा, नामपूर - फोपीर - गोराणे, सोमपूर - दरेगाव - कातरवेल, एकलहरे - जायखेडा - लाडुद, चौंधाणे फाटा - जोरण हे रस्ते प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत प्रस्तावित करण्यात आले होते.

या प्रस्तावित रस्त्यांना शासनाने मंजुरी दिली असून त्यामध्ये बंधारपाडे - वनोली - चौंधाणे फाटा या तीन किलोमीटर आणि ८४० मीटर रस्त्याच्या कामासाठी २ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Funds News
Onion Crop Crisis : कांद्याचे घसरते भाव अन्‌ करपाचा प्रादुर्भाव!

नामपूर - फोपीर - गोराणे - आसखेडा रस्ता या आठ किलोमीटर आणि ७५० मीटर रस्ता सुधारणा कामासाठी ६ कोटी ३० लाख रुपये, सोमपूर – दरेगाव - कातरवेल या सात किलोमीटर आणि ९२० मीटर कामासाठी ६ कोटी, चौंधाणे फाटा - जोरण - पठावे दिगर या सहा किलोमीटर आणि १३० मीटर कामासाठी ४ कोटी ३६ लाख आणि एकलहरे रोड - जायखेडा - लाडुद या चार किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी ३ कोटी १० लाख रुपये असे एकूण २२ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया राबवून लवकरच प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करण्यात येणार असल्याचेही आमदार बोरसे यांनी सांगितले.

"भाजप - सेना युतीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर विकासकामांना गती मिळाली आहे. या सहा महिन्याच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, पर्यटन विकास, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, जिल्हा नियोजन असे दीडशे कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहे." - दिलीप बोरसे, आमदार, बागलाण

Funds News
Spices Rate Hike : मसाल्याच्या पदार्थांच्या दरात वाढ! भाव वाढीमुळे गृहिणी त्रस्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com