मागासवर्गीय वसतिगृहाचा निधी मिळावा | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदन

नाशिक : मागासवर्गीय वसतिगृहाचा निधी मिळावा

नाशिक रोड : आदिवासी, भटके विमुक्त व मागासवर्गीय मुला- मुलींचे वसतिगृहाचा निधी संबंधित वसतिगृहांना मिळवा या मागणीचे निवेदन बहुजन रयत परिषदेतर्फे माजीमंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या उपस्थितीत विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांना देण्यात आले.

आदिवासी विभाग आणि भटके विमुक्त जाती- जमाती आणि मागासवर्गीय विभागाचे अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वसतीगृह चालविण्यासाठी जो निधी येतो, तो वेळेत मिळाला नाही.

हेही वाचा: औरंगाबाद : पंढरपूर येथे अवैध गॅस रिफलिंग सेंटरवर छापा

परिणामी वरील आदिवासी, भटके विमुक्त आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांची दिवाळी होऊ शकली नाही. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना वसतिगृहाचा निधी ताबडतोब वर्ग करण्याचे आदेश द्यावे. येत्या १० दिवसांत वसतिगृहाचा निधी वाटप न झाल्यास बहुजन रयत परिषदेतर्फे आंदोलनाचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या वेळी बहुजन रयत परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य साहेबराव श्रृंगार, प्रदेश उपाध्यक्ष अनिल बाविस्कर, सूर्यकांत भालेराव, जिल्हाध्यक्ष नानासाहेब खंडाळे, दत्ताराव काळोखे, नितीन मोकळ, अशोक जाधव, सुभाष मोरे आदी उपस्थित होते.

loading image
go to top