
दलित वस्तीचा विकास निधी अन्यत्र खर्च होत आहे : देवराज गरुड
मालेगाव (जि. नाशिक) : मालेगाव महापालिकेत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे (Anna Bhau Sathe) वस्तीसुधार योजनेंतर्गत शासन मान्यतेनुसार सार्वजनीक बांधकाम विभागातर्फे दलित वस्तीतील विकास निधी अन्यत्र खर्च केला जात आहे. दलित वस्तीलगतच्या अन्य वस्तींमध्ये या निधीतून कामे केली जात आहेत. या प्रकाराला जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ प्रतिबंध करावा, अशी मागणी रिपाइंचे (RPI) प्रदेश उपाध्यक्ष तथा दलितमित्र देवराज गरूड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
हेही वाचा: नांदगावमध्ये सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा; आमदार सुहास कांदे
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जाहिर ई- निविदा (क्र. ०११/२०२१-२०२२) प्रमाणे एकूण २० कामे दलित वस्तीलगत असलेल्या इतर घटकांच्या वस्तीमध्ये केली जात आहेत. त्यामुळे दलित समाजावर अन्याय होत आहे. कोट्यवधी रुपयांच्या या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार (Corruption) होण्याची दाट शक्यता आहे. दलित वस्तीच्या विकासासाठी शासनाने दिलेला निधी दलित वस्तीतच त्याचा विनियोग करावा. अन्यत्र, हा निधी वळविण्यात येवू नये, अशी कायद्यात तरदूत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दलित वस्तीलगतच्या भागामध्ये कामाबरोबरच रस्त्याची देखील कामे केली जात आहेत. सदर कामे जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ बंद करावीत, अशी मागणीही श्री. गरुड यांनी निवेदनात केली आहे.
हेही वाचा: शिकंजी व्यवसायात यशोधनची अनोखी भरारी; समाजापुढे ठेवला आदर्श
Web Title: Funds For Dalit Development Are Being Spent Elsewhere Devraj Garud Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..