नांदगावमध्ये सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा; आमदार सुहास कांदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Senas saffron elected in society election of Nandgaon

नांदगावमध्ये सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा; आमदार सुहास कांदे

नांदगाव (जि.नाशिक) : सहकार क्षेत्रातील विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा (Shivsena) भगवा फडकविला गेला असल्याने त्यासाठी आपण सर्वांनी एकजूट दाखविल्याचे समाधान असून, भविष्यात देखील अशीच एकजूट टिकवून ठेवा, असे आवाहन आमदार सुहास कांदे यांनी केले.

विविध कार्यकारी सेवा संस्थांच्या निवडणुकीत बहुतांशी ठिकाणी विधानसभा मतदारसंघातील गावांतून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बाजी मारली असून, याठिकाणी विजयी झालेल्या शिवसेनेच्या संचालकांचा आमदार कांदे यांच्या हस्ते शिवनेरी विश्रामगृहावर सत्कार करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार कांदे बोलत होते. या वेळी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य प्रमोद भाबड, माजी सभापती विलास आहेर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश बोरसे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख किरण देवरे, शहरप्रमुख सुनील जाधव यांच्यासह संस्थांचे पदाधिकारी व नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते.

हेही वाचा: शिकंजी व्यवसायात यशोधनची अनोखी भरारी; समाजापुढे ठेवला आदर्श

सहकारातील या विजयामुळे आमदार कांदे यांच्या लोकाभिमुख नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाल्याची भावना विलास आहेर, रमेश बोरसे यांनी व्यक्त केली. आमदार कांदे यांच्या नेतृत्वात नांदगाव विधानसभा (Assembly) मतदारसंघातील नुकत्याच झालेल्या सोसायटी निवडणुकांमध्ये काही अपवाद वगळता बहुतांशी सोसायट्यांवर शिवसेनेचा भगवा फडकला असून, त्यातून त्यांचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे.

हेही वाचा: ऊस जळाला...आर्थिक नुकसान सहन न झाल्याने महिलेचा हृदयविकारामुळे मृत्यू

Web Title: Shiv Senas Saffron Elected In Society Election Of Nandgaon Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..