''कोरोना मृतांच्या अंत्यविधीचा खर्च पालिकेने करावा''

शहरात कोरोनामुळे(corona virus) मृत्यूसंख्या(death rate) वाढली आहे. त्यातच अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी अधिक आकारणी होत आहे.
corona death
corona deathesakal

येवला (जि. नाशिक) : शहरात कोरोनामुळे(corona virus) मृत्यूसंख्या(death rate) वाढली आहे. त्यातच येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी अधिक आकारणी होत आहे. त्यामुळे येथे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या अंत्यविधीचा खर्च पालिकेने करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे गटनेते, नगरसेवक प्रवीण बनकर यांनी केली आहे. (The cost of the funeral of the Corona deceased should be borne by the municipality)

कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना

शासनाने १४ सप्टेंबरला याबाबत आदेश निर्गमित केले असून, यात १४ व्या वित्त आयोगाच्या निधीवरील व्याजाच्या रकमेचा विनियोग करताना कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये कन्टेन्मेंट झोन(containment zone) घोषित करणे, कन्टेन्मेंट झोनचे व्यस्थापन करणे, कोविड केअर सेंटरचे व्यवस्थापन करणे, (औषधोपचाराचा खर्च वगळून) कोविड उपाययोजनांच्या अनुषंगाने अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणारा खर्च करण्यासही मंजुरी दिली आहे, तसेच येथील आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सूचित केल्याप्रमाणे कोरोना आजारासंबंधी मृत व्यक्तींच्या अंत्यविधीचा खर्च व इतर उपाययोजना या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच पालिका प्रशासनाने कराव्यात, अशा सूचना दिल्या आहेत.

corona death
"पब्जी-2'मधून पुन्हा एकदा मोठ्या अनर्थाची शक्‍यता !

नागरिकांना द्यावा दिलासा

पालिका (वर्ग ब) यांना एकूण २० लाख रुपयांपर्यंत खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. घरातील कर्त्या सदस्यांचे निधन होत आहेच, पण अनेक गरीब कुटुंबांतील सदस्यांचे निधन होत असल्याने अशा अडचणीच्या काळात त्यांना आधार देण्याची गरज आहे. नागरिकांच्या हितासाठी पालिकेने कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या अंत्यसंस्काराचा सर्व खर्च करावा व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी बनकर यांनी केली आहे.

corona death
अचूक वीजबिल हवंय? कोरोना काळात महावितरणची विशेष सुविधा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com