"पब्जी-2'मधून पुन्हा एकदा मोठ्या अनर्थाची शक्‍यता !

पब्जी-टू मधून पुन्हा एकदा मोठ्या अनर्थाची शक्‍यता वर्तवली जात आहे
PubG-2
PubG-2Canva

फेसबुकवरील फ्रेंड्‌स, (Facebook) इन्स्टाग्रामवरील, (Instagram) ट्विटरवरील (Twitter) फॉलोअर्सच्या आभासी जगात रमणाऱ्या तरुणाईला कोरोनाच्या कहरात तर आणखीच जास्त गुंतवले आहे. सोशल डिस्टन्स, एकमेकांपासून दूर राहण्याची वेळ सर्वांवर आली आहे. त्यामुळे पब्जीसारख्या (PubG) गेमला ही तरुणाई जवळ करीत असते. या आभासी युगात समाज माध्यमांकडे तरुणाई मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे. मोठमोठ्या शहरांत तर कमालीची अस्वस्थ तरुणाई या आभासी जगालाच भुललेली दिसत आहे. याचे लोण तर सोलापूरसारख्या शहरांपर्यंत वळले आहे. त्यामुळे हा चिंतेचा विषय बनू लागला आहे. केंद्र सरकारने या गेमला परवानगी नाकारावी; अन्यथा पुन्हा एकदा मोठ्या अनर्थाला सामोरे जावे लागेल. (PubG-2 is once again raising the possibility of a major catastrophe)

ज्येष्ठ सनदी अधिकारी दाम्पत्याच्या एकुलत्या एक मुलाने केलेली आत्महत्या असो, की पब्जीसारख्या गेमच्या नादी लागून सोलापुरातून पुण्याकडे बसमधून निघालेल्या तरुणाची कथा असो, हे विषय पालकांना तसेच समाजाला काळजीत टाकणारे ठरू लागले आहेत. यावर उपाय म्हणून चिनी बनावटीच्या 20हून अधिक ऍप्सना केंद्र सरकारने गेल्यावर्षी बंदी घातली होती. परंतु आता पुन्हा नव्याने पब्जी-2 च्या रूपाने येणाऱ्या महाभयंकर अशा रोगाविरोधात लढण्याची वेळ येणार आहे. भारत सरकारने याला अद्याप परवानगी दिली नाही; परंतु परवानगी दिली तर मात्र पुन्हा एकदा मोठा कहरच होणार आहे.

PubG-2
इम्युनिटी वाढवण्यासाठी गुळवेल, गवती चहा, काळ्या हळदीची वाढली मागणी ! जाणून घ्या यांचे गुणधर्म

पब्जी कॉर्पोरेशनने पब्जी-2 या गेम्सची भारतीय उपकंपनी तयार केली आहे. आतापर्यंत परदेशी बनावटीच्या गेम्सवर भर देणाऱ्या या कंपनीने भारतीय तरुणाईला आणखी जास्त आकर्षित करण्यासाठी इतिहास, रामायण, महाभारतासारख्या भारतीय संस्कृतीचे आकर्षण वाढवणाऱ्या गेम्स तयार केल्या आहेत. युद्धाची मनोरंजनात्मक पार्श्‍वभूमी असलेल्या या खेळात आठ ते 30 वयोगटातील किशोरवयीन मुले व तरुण जास्त रमतात, असा निकर्ष आहे. या गेममधील आक्रमक आभासी जग हे सत्यात उतरवता येईल का, या विचारातून काही गंभीर स्वरूपाचे गुन्हेही घडले आहेत. पब्जी कॉर्पोरेशनकडून भारतात 100 कोटींची गुंतवणूक करण्याची योजना आहे. "नव्या बाटलीत जुनी दारू' अशीच ही योजना आहे.

सायबर अभ्यासक ऍड. मंजुनाथ कक्कळमेली म्हणतात, डिसेंबर महिन्यात पब्जी मोबाईल इंडियाच्या लॉंचिंगबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे दोन आरटीआय दाखल झाल्या होत्या. मीडियानामा आणि जेम इस्पोर्टस्‌ यांनी माहितीच्या अधिकाराद्वारे माहिती मागविली आहे. सरकारने क्राफ्टन किंवा त्याची सहाय्यक पब्जी कॉर्पोरेशन यांना पब्जी मोबाईल इंडिया गेम भारतात लॉंचिंगसाठी परवानगी दिली आहे का, अशी विचारणा करण्यात आली होती. त्यावर मंत्रालयाने लॉंचिंगसाठी परवानगी दिली नसल्याचं स्पष्ट केलं होतं. परंतु 7 एप्रिल रोजी पब्जी पॅरेंट कंपनी क्राफ्टनने भारतात एक नवीन वेबसाइट डोमेन www.battlegroundsmobileindia.in रजिस्टर केले असल्याचा दावाही जेमवायरकडून करण्यात आला आहे. पण नेमका हा गेम भारतात केव्हा लॉंच होईल, याची तारीख सांगण्यात आलेली नाही. मात्र या वर्षीच्या मध्यापर्यंत हा गेम अँड्रॉइड आणि आयओएस प्लॅटफॉर्म्ससाठी रिलीज केला जाण्याची शक्‍यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

PubG-2
भारतात पब्जी-टू होणार लॉंच? भारतीय संस्कृतीवर असणार नवी रचना !

परंतु लडाखमध्ये चीनसोबत उद्‌भवलेल्या संघर्षानंतर भारत सरकारने भारतीय माहिती तंत्रज्ञान 69 कायदा कलम अ अन्वये पब्जीसह शेकडो चिनी ऍप्स बंद केले आहेत. त्यामुळे सार्वभौम सुरक्षिततेच्या दृष्टीने अजून तरी कुठल्याही प्रकारच्या "बॅटलग्राउंड्‌स मोबाईल इंडिया' नावाने भारतात येऊ पाहणाऱ्या चिनी कंपनीस कुठल्याही प्रकारची कायदेशीर परवानगी केंद्र सरकाने दिली नसल्याचे समजते. भारत सरकारने सप्टेंबर 2020 मध्ये जवळजवळ सर्व चिनी अप्सवर बंदी आणलेली आहे. त्यामुळे सध्या क्राफ्टन कम्पनीने जरी चिनी कंपनीशी आपले संबंध तोडले असले तरी पब्जीची ही मूळ कंपनी असल्याने भारतीय माहिती तंत्रज्ञान कलम 69 अ खाली घालण्यात आलेली आहे, त्यामुळे फक्त नाव बदलल्याने बंदी उठणार नाही व ते या क्राफ्टनवरही लागू पडते.

पब्जीवरील आरोप

पब्जीच्या माध्यमातून चिनी कंपनी टेन्सेंट ही भारतीय युजर्सची माहिती चोरत असल्याचा आरोप आहे. तसेच या खेळाचे स्वरूप "मारामारी व हिंसक' असल्याने किशोरवयीन मुलांच्या मानसिकतेवर हिंसक परिणाम होताना दिसून येत असल्याने केंद्र सरकारने बंदी आणलेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com