esakal | ख्रिस्ती धर्मगुरूंचे दफनविधीऐवजी अग्निसंस्कार! अखेरच्या क्षणीही कृतिशील शिकवण 
sakal

बोलून बातमी शोधा

father rudi 1.jpg

ख्रिस्ती धर्मातील पुनरुत्थान संकल्पनेनुसार पारंपरिक दफनविधीऐवजी त्यांनी अग्निसंस्कार करीत धार्मिक श्रद्धा आड येऊ दिली नाही. सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने कोविड मृतावर दफन संस्काराऐवजी अग्निसंस्कारच योग्य असल्याचा संदेश देण्यासाठी स्वतःवर अग्निसंस्कार केले. 

ख्रिस्ती धर्मगुरूंचे दफनविधीऐवजी अग्निसंस्कार! अखेरच्या क्षणीही कृतिशील शिकवण 

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : धर्मगुरू आयुष्यभर प्रवचने देत असतात. येथील इन्फ्रन्ट जीझस श्राइन चर्चचे फादर रूडी फर्नांडिस यांनी मात्र मृत्यूनंतरही त्यांच्या कृतीतून अनुयायांना शिकवण दिली आहे. ख्रिस्ती धर्मातील पुनरुत्थान संकल्पनेनुसार पारंपरिक दफनविधीऐवजी त्यांनी अग्निसंस्कार करीत धार्मिक श्रद्धा आड येऊ दिली नाही. सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने कोविड मृतावर दफन संस्काराऐवजी अग्निसंस्कारच योग्य असल्याचा संदेश देण्यासाठी स्वतःवर अग्निसंस्कार केले. 

अखेरच्या क्षणीही धर्मगुरूंची कृतिशील शिकवण 
ख्रिश्चन धर्मात पुनरुत्थान ही संकल्पना सांगितली आहे. पुनरुत्थान म्हणजे अंतिम निवाड्याच्या दिवशी परमेश्वर सर्व मृत लोकांना सदेह जिवंत करून त्यांना स्वर्गात पाठवायचे की नरकात हे ठरवील. यालाच कयामत किंवा (द डे ऑफ जजमेंट) असे म्हटले जाते. या श्रद्धेमुळेच ख्रिस्ती आणि मुस्लिम धर्मात मृतदेहावर दफन संस्कार केले जातात. कोविडच्या काळात ही श्रद्धा अनेक ठिकाणी अडचणीची ठरत असताना, वैज्ञानिक दृष्टिकोनातून कोविडने दगावलेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कारच करणे गरजेचे असते. देशात अनेक ठिकाणी दहन की दफन यामुळे वाद आणि आंदोलने झाली. न्यायालयालाही धार्मिक श्रद्धेच्या आड येता येणार नाही, असा निर्वाळा द्यावा लागला. परिणामी, कोविडने दगावलेल्यांवर सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने ते धोकादायक असले तरी अनेक ठिकाणी अपुऱ्या सोयी-सुविधा असताना दफन संस्काराची वेळ आली. 

धर्मगुरूंचा पुढाकार 
नाशिक रोड येथील बाल येशू देवालयाचे ज्येष्ठ धर्मगुरू फादर रूडी फर्नांडिस यांनी मात्र मरणोत्तर उत्तम आदर्श घालून दिला. फादर रूडी यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी नाशिक रोडला खासगी रुग्णालयात मंगळवारी निधन झाले. त्यांची मरणोत्तर देहदानाची इच्छा होती. तशी कायदेशीर प्रक्रियाही चार-पाच वर्षांपूर्वी त्यांनी आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन पूर्ण केली होती. कोविडमुळे देहदान स्वीकारले जाणार नाही याची जाणीव झाल्यानंतर फादर रूडी यांनी एक पाऊल पुढे टाकत त्यांच्या मृतदेहावर अग्निसंस्काराने अंत्यसंस्कार करण्यात यावेत, अशी इच्छा त्यांच्या वरिष्ठांकडे व्यक्त केली. वरिष्ठांनी त्यांच्या अंतिम इच्छेला संमती देत, त्याप्रमाणे मंगळवारी पहाटे त्यांच्या निधनानंतर नाशिक कॅथलिक धर्मप्रांताचे बिशप लुर्डस डॅनियल यांनी पारंपरिक ख्रिस्ती पद्धतीने अस्थींना आशीर्वाद दिले. आयुष्यभर सेंट झेवियर्स शाळेच्या माध्यमातून विद्यार्थी घडविण्याच्या प्रक्रियेत अग्रभागी असलेल्या रूडी यांनी मरणोत्तरही शिक्षणच दिले. 

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान

पारंपरिक दफनविधीऐवजी ख्रिस्ती धर्मगुरूंचे अग्निसंस्कार 
मृत रूडी यांनी, त्यांच्या वरिष्ठांना याचे कारण विचारले असता त्यांनी, लोकांना उदाहरण घालून देणे आवश्यक आहे. धर्मगुरूंनी पुढाकार घेऊन नवीन आदर्श निर्माण केला तर ख्रिस्ती लोकांचा विरोध आपोआप कमी होत जाईल आणि कोरोनाच्या या महामारीत सामाजिक आरोग्य टिकून राहण्यासाठी हातभार लागेल असे वरिष्ठांना पटवून दिले. 

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी

loading image
go to top