कोरोनाने सर्व चित्रच बदलले : दशक्रिया विधी बनले केवळ ‘सोपस्कार’

एकाच कुटुंबातील अनेक जणांवर मृत्यूचा घाला पडत असल्याने दशक्रिया विधीऐवजी पंचक्रिया विधीतच सर्व विधी उरकले जात आहेत.
death
deathesakal

पंचवटी : कोरोनाच्या(corona virus) थैमानाने कळस गाठला असून, शहरातील मुख्य स्मशानभूमीसह पंचवटीतील स्मशानभूमीतही अंत्यसंस्कारासाठी रांगा लागत आहेत. एकाच कुटुंबातील अनेक जणांवर मृत्यूचा(death) घाला पडत असल्याने दशक्रिया विधीऐवजी पंचक्रिया विधीतच सर्व विधी उरकले जात असल्याने अनेक कुटुंबीयांसाठी हे विधी म्हणजे केवळ एक ‘सोपस्कार’ बनले आहेत. (Dashkriya rituals are being performed only as a necessity)

कोरोनाच्या उद्रेकाचा परिणाम

मागील वर्षी कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यामुळे त्याच्याबाबतचे गांभीर्य समाजमनात तितकेसे नव्हते. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यातील उद्रेकामुळे एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक व्यक्ती मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. हिंदुधर्मीयांत(hindu religion) दशक्रिया विधीसह संबंधित व्यक्तीचा तेरावा, महिना त्यानंतर शेवटचा विधी म्हणजे वर्षश्राद्ध याला खूप महत्त्व आहे. कोरोनाच्या उद्रेकापूर्वी दशक्रिया विधी, वर्षश्राद्ध या विधींना संबंधितांचे नातलग मोठ्या संख्येने उपस्थित राहत असल्याने काही ठिकाणी हजारो लोकांच्या उपस्थितीत हा विधी होत असे. ग्रामीण भागातील विधींसाठी, तर एखाद्या लग्नापेक्षा अधिक गर्दी होत असे; परंतु कोरोनाने सर्व चित्रच बदलले आहे. संसर्गाच्या भीतीने या काळात जवळचे आप्तही दुरावल्याचा अनेकांना अनुभव आहे. त्यामुळे केवळ घरातल्या व अतिशय जवळच्या व्यक्तीच या विधींना उपस्थित राहत असल्याने केवळ पाच-दहा लोकांच्या उपस्थितीतच हे विधी करावे लागण्याची नामुष्की ओढवली आहे.

death
यंदाही बारगळणार CET परीक्षांचे वेळापत्रक; विद्यार्थ्यांना ‘तारीख पे तारीख!

दुःख करावे कुणाचे?

काही कुटुंबांत एकाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याच्या दशक्रियेच्या आधीच अन्य काही जणांना मृत्यू गाठत असल्याने संबंधितांच्या पंचक्रिया विधीतच दशक्रिया विधीचे सोपस्कार पार पडत आहेत. यात गंभीर म्हणजे एकाच कुटुंबातील अनेक जण कोरोनामुळे मृत्यूला जवळ करत असल्याने हे विधी करण्यासाठीही सदस्य उरले नाहीत, अशी परिस्थिती आहे. एकापाठोपाठ अनेकांचे मृत्यू झाल्याने दुःख करावे कोणाचे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरेतर दशक्रिया व तेरावा हे स्वतंत्र विधी आहेत, परंतु तेही काही ठिकाणी एकत्रित केले जात असल्याचे चित्र आहे.

death
हापूस आंब्याचा सेल! अशी नोंदवू शकता ऑर्डर

''सुरवातीच्या काळात कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी होती; परंतु आता एकाच कुटुंबातील अनेक जण यामुळे मृत्यूला कवटाळत आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांतील दशक्रिया विधी पंचक्रियेवर आला आहे.''

-सतीश शुक्ल, अध्यक्ष, गंगा गोदावरी पुरोहित संघ, नाशिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com