टोमॅटोवर बुरशी, द्राक्ष छाटणीवर प्रश्‍नचिन्ह; अतिवृष्टीने शेतीत पाणीच पाणी

Water accumulated in crops due to heavy rains in Wadgaon, Karvandewadi areas
Water accumulated in crops due to heavy rains in Wadgaon, Karvandewadi areasesakal

गिरणारे/गंगापूर (जि. नाशिक) : गेल्या तीन दिवसापासून नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अतिवृष्टीने यंदा मोठ्या प्रमाणात विक्रमी लागवड केलेल्या टोमॅटो व द्राक्षाच्या शेतात पाणीच पाणी झाले आहे. नगदी पीक टोमॅटोवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव, तर द्राक्षाची ऑक्टोबर छाटणी लांबणार आहे.

याचा विपरीत परिणाम द्राक्षाच्या फुटव्यावर होईल. नैसर्गिक संकटात कसे जगायचे असा सवाल दरी (ता. नाशिक) येथील शेतकरी भारत पिंगळे व वाडगाव येथील शेतकरी राजाभाऊ कसबे यांनी केला आहे. (fungus crisis on tomato crop grape pruning Due to heavy rain Nashik Latest Marathi News)

टोमॅटो पिकावरील बुरशीजन्य रोग
टोमॅटो पिकावरील बुरशीजन्य रोगesakal

यंदा लांबलेला पाऊस जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाला. या पावसाने खरिपाची लागवड लांबली, पेरण्यांना उशीर झाला. भात, नागली, वरई, सोयाबीन, भुईमूग पीक उशिरा पेरली गेली. तर टोमॅटो रोपांची शेतात होणारी लागवड अशक्य झाल्याने गिरणारे, मातोरी, दरी, देवरगाव, वाडगाव भागातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात रोपे नर्सरीमधून विकत घेतली.

काहींनी रोपवाटिकेत नर्सरीत वाफे घेऊन रोपे बनवली व लागवड केली. यंदा नाशिक, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी तालुक्यात टोमॅटोची विक्रमी लागवड आहे. सुरवातीला अनुकूल वातावरण असल्याने टोमॅटो जोमात होता. मात्र, सप्टेंबरमध्ये सातत्याने होणारी अतिवृष्टी व गुरुवारपासून अखंडित पडणाऱ्या पावसाने मात्र कहरच केला. पिकाच्या सरीत पाणीच पाणी झाले.

याचा परिणाम टोमॅटो वाढीवर झाला आहे. दरी मातोरी भागात तर बुरशीजन्य रोगाने टोमॅटोवर सुकवा येत आहे. पिकाच्या मुळांना रोगाचा अधिक धोका पोचत आहे. रोजच्या कीटकनाशके फवारणीसाठी लागणारा मजूर व कीटकनाशके खर्च वाढला आहे.

मात्र रोग आटोक्यात येत नसल्याचे शिवाजी धोंडगे, संदीप निकम यांनी सांगितले. तर अतिपावसाने द्राक्षाला मोठा फटका बसला असून, ऑक्टोबरमध्ये होणारी द्राक्ष छाटणी लांबणार आहे. पुढे फुटव्यावर याचा परिणाम होणार असल्याने मोठी चिंता असल्याचे भारत पिंगळे यांनी सांगितले.

Water accumulated in crops due to heavy rains in Wadgaon, Karvandewadi areas
दुचाक्या चोरणाऱ्या दिल्लीतील सराईताला अटक; 6 दुचाक्या हस्तगत

"यंदा खरिपाच्या लागवडीसाठी कुठले ही पीककर्ज मिळाले नाही. कसेबसे भांडवल उभे करून टोमॅटो लागवड केली. यंदा मशागत, रोपे, लागवड, मजुरी, फवारणी, खते देणे व बांबू, तार, सुतळी बांधणीसाठी मोठा खर्च लागत आहे. मजुरी वाढली आहे. अशात ढगाळ हवामानामुळे टोमॅटो पिकासाठी रोजच्या फावरणीचा खर्च वाढलाय. कष्ट करूनही यंदा ही अतिवृष्टीने पीक वाचवायचे कसे, यासाठी जीवघेणे कष्ट सुरू आहे."

- शिवाजी धोंडगे, टोमॅटो उत्पादक, दरीगाव

"अतिवृष्टीने शेतात टोमॅटोवर सुकवा आला आहे. अळीने पीक सुकले असून, फवारण्या करूनही रोग आटोक्यात येत नाही. परिणामी मोठे नुकसान होणारे यंदाही आमची पाठ सोडत नाही." - संदीप निकम, टोमॅटो उत्पादक

Water accumulated in crops due to heavy rains in Wadgaon, Karvandewadi areas
Nashik : शहर परिसरात तिघांनी गळफास घेत संपविली जीवनयात्रा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com