नाशिक- इयत्ता अकरावीच्या विविध शाखांतील प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांची दुसऱ्या फेरीची निवड यादी गुरुवारी (ता. १७) जाहीर होणार आहे. त्याच दिवशी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील (आयटीआय) प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या दुसऱ्या फेरीची निवड यादीदेखील प्रसिद्ध केली जाणार आहे. या फेरीस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.