धुळे : टुडे पान २ साठी..
--
फोटो क्रमांक : 31241
धुळे : महात्मा गांधी जयंतीनिमित्त काँग्रेस सेवा दलातर्फे झालेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांसह आलोक रघुवंशी. शेजारी शिक्षक.
--
महात्मा गांधी जयंतीनिमित्त
प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात
--
जिल्हा काँग्रेस सेवा दलाचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ३ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनकार्य, सत्य, अहिंसा, स्वावलंबन आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी तसेच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रसेवा व सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने महात्मा गांधी प्रश्नमंजुषा स्पर्धा झाली. शहरातील राजीव गांधी माध्यमिक विद्यालय आणि सातपुडा माध्यमिक विद्यालय येथे ही प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचे दोन गट करण्यात आले होते. यात पाचवी, सहावी व सातवीचा पहिला गट आणि आठवी, नववी व दहावीचा दुसरा गट अशा पद्धतीने प्रश्नमंजुषा घेण्यात आली. दोन्ही गटांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत प्रश्नमंजुषा पूर्ण केली. दोन्ही विद्यालयांतील मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी स्पर्धेच्या आयोजनासाठी सहकार्य केले. महात्मा गांधी यांच्या विचारांचा आणि कार्याचा विद्यार्थ्यांमध्ये परिचय व्हावा, त्यांच्या जीवनातील सत्य, अहिंसा, स्वावलंबन व मानवतेच्या मूल्यांची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घ्यावी, या हेतूने हा उपक्रम झाला. स्पर्धेचे परीक्षेचे आयोजन जिल्हाध्यक्ष आलोक रघुवंशी यांनी केले होते.