लामकानीत संस्कार परीक्षा

लामकानीत संस्कार परीक्षा
Published on: 
LMK26B00801 लामकानी : स्कूलमध्ये परीक्षा देताना विद्यार्थी. ----------- समाजाला गांधी विचारांची नितांत गरज बाविस्कर : इंग्लिश स्कूलमध्ये गांधी विचार संस्कार परीक्षा सकाळ वृत्तसेवा लामकानी, ता. ३ : सहज हिंसा वाढत असताना महात्मा गांधी यांच्या अहिंसेची मूल्य रुजूने खुप महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांचे विचार समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. दररोजच्या जीवनातील विपरीत घटना पाहता आज समाजाला गांधी विचारांची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन इंग्लिश स्कूल माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. डी. बाविस्कर यांनी केले. लामकानी येथील इंग्लिश स्कूल माध्यमिक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. महात्मा गांधी जयंतीनिमित्त महात्मा गांधी रिसर्च फाउंडेशनच्या वतीने शाळेत ‘महात्मा गांधी विचार संस्कार परीक्षा’ घेण्यात आली. पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महात्मा गांधी यांच्या जीवनचरित्रावर आधारित इयत्तानिहाय ६० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत २३७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. मुख्याध्यापक एस. डी. बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाने परीक्षा केंद्र समन्वयक म्हणून पी. ए. कुवर, एस. आर. नागमल, पी. एस. कोळपकर व डी. जे. शेलार यांनी काम पाहिले. पर्यवेक्षक म्हणून शिक्षक खेमचंद पाकळे, के. आर. पाटील, एन. पी. येवले, एन. बी. ठाकूर, श्रीमती जे. बी. ठाकूर, के. जे. गिरासे व मनीषा हराळे यांनी जबाबदारी सांभाळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com