धुळे टुडे २ साठी मेन
---
फोटो- NSK26H31183, NSK26H31184, NSK26H31185
धुळे ः आघाव अध्यापक विद्यालय व कन्या विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त अभिवादनाप्रसंगी उपस्थित शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी. दुसऱ्या छायाचित्रात श्री पिंपळादेवी विद्यालयात अभिवादनाप्रसंगी उपस्थित शिक्षक. शेवटच्या छायाचित्रात श्री एकवीरादेवी विद्यालयात अभिवादनाप्रसंगी उपस्थित शिक्षक-शिक्षिका.
---
महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्रींना अभिवादन
धुळ्यात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये जयंतीनिमित्त कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २ ः राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहर व परिसरातील विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रतिमापूजन, सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व, रांगोळी व चित्रकला स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दोन्ही नेत्यांच्या स्मृतीस उजाळा दिला. महात्मा गांधींचे सत्य व अहिंसेचे विचार आणि लालबहादूर शास्त्रींचा साधेपणा व देशसेवा यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आचरणात आणावा, असे आवाहन मान्यवरांनी केले.
पिंपळादेवी विद्यालय
मोहाडी उपनगरातील श्री पिंपळादेवी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी झाली. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक व्ही. बी. ठाकरे अध्यक्षस्थानी होते. तर माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस. एस. पाटील प्रमुख पाहुणे होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. मुख्याध्यापक ठाकरे यांनी दोन्ही नेत्यांच्या कार्याची माहिती देत त्यांचे विचार अंगीकारण्याचे आवाहन केले. यानिमित्त निबंध, रांगोळी व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. डी. ए. देवरे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला पर्यवेक्षक ए. आर. पाटील, एस. एन. सोनवणे, व्ही. बी. कापडणीस, एस. डी. देवरे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
श्री एकवीरादेवी विद्यालय
श्री एकवीरादेवी माध्यमिक विद्यालयात अभिवादन कार्यक्रम झाला. मुख्याध्यापिका ए. ए. भदाणे, ज्येष्ठ शिक्षक एस. बी. वाघ, पी. व्ही. दीक्षित, बी. बी. सोनवणे यांच्याहस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन झाले. याप्रसंगी आयोजित निबंध स्पर्धेत ४५ विद्यार्थ्यांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत जान्हवी माळी, हिमानी कुंटे, लावण्या मोराणकर, रेणुका वाघ, स्वराली शिंदे, भाग्यश्री शिंदे, धनश्री गोसावी, पूर्वा पाटील व पूर्वा बाविस्कर यांनी सहभाग घेतला. महात्मा गांधी हे फक्त चलनी नोटांवरच नसून प्रत्येक भारतीयाच्या मनावर छापलेले आहेत असे मुख्याध्यापिका भदाणे म्हणाल्या. एस. एस. पाटील, एन. एस. पाटील व व्ही. टी. पाटील यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. विद्यालयाचे चेअरमन प्रशांत वाघ व सचिव प्रदीप वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला.
डॉ. आंबेडकर हायस्कूल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम झाला. प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील अध्यक्षस्थानी होते. पर्यवेक्षक प्रदीप इन्सुलकर उपस्थित होते. शिक्षिका स्नेहल वडनेरे यांनी महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. प्राचार्य पाटील यांनी ‘जय जवान, जय किसान’चा संदेश देणाऱ्या शास्त्रीजींच्या साधेपणाचे व दूरदृष्टीचे दाखले दिले. स्वच्छता सप्ताहानिमित्त आयोजित वर्ग सजावट स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. पी. एस. पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
प्रा. निकम फार्मसी
गोंदूर येथील प्रो. रवींद्र निकम कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये महात्मा गांधी जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. ए. व्ही. पाटील, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सागर जाधव आणि ओबीव्हीएस निकम कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. जसवंत लामले उपस्थित होते. संस्थाचालक प्रा. रवींद्र निकम, सचिव शुभांगी निकम व उपाध्यक्ष रोहित निकम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमातून समाजात शांतता, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश देण्यात आला.
आघाव अध्यापक विद्यालय
श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या आघाव अध्यापक विद्यालय व कन्या विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन करण्यात आले. प्राचार्य पी. एस. सोनवणे अध्यक्षस्थानी होते. उपप्राचार्य एम. टी. पाटील प्रमुख पाहुणे होते. प्रा. पी. एम. पाटील, डॉ. अनिता देवरे, प्रा. बी. के. मराठे, प्रा. व्ही. आर. पाटील, डॉ. अरुणा कासारे, दोन्ही विद्यालयांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. एच. आर. बडगुजर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
सावता माळी शाळा
सावता माळी प्राथमिक शाळेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर माळी यांच्याहस्ते प्रतिमापूजन झाले. मुख्याध्यापिका मीना अहिरे, भारती वाघ, मनीषा रोकडे, प्रतिभा बाविस्कर, मृणालिनी बाविस्कर, संगीता पवार आदी शिक्षक उपस्थित होते. उपस्थित शिक्षकांनी दोन्ही नेत्यांच्या देशसेवेची आणि विचारांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.