नाशिक : महाविकास आघाडीतर्फे सटाण्यात गांधीगिरी

Gandhigiri agitation in Satana by Mahavikas Aghadi latest marathi news
Gandhigiri agitation in Satana by Mahavikas Aghadi latest marathi newsesakal

सटाणा (जि. नाशिक) : पालिका (Municipality) हद्दीतून जाणाऱ्या साक्री- शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर (National highway) पावसाळा (Monsoon) सुरू झाल्यापासून दीड ते दोन फुटखोल खड्डे पडले आहेत. पावसाच्या पाण्याने खड्डे भरल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

याच्या निषेधार्थ सटाणा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) व महाविकास आघाडीतर्फे (Mahavikas aghadi) राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता. १३) भर पावसात खड्ड्यात उभे राहुन पालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) निषेधार्थ गांधीगिरी आंदोलन छेडण्यात आले.

या वेळी रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पेढे भरवून गांधीगिरीही करण्यात आली. (Gandhigiri agitation in Satana by Mahavikas Aghadi nashik Latest Marathi News)

Gandhigiri agitation in Satana by Mahavikas Aghadi latest marathi news
सिलिंडर पोच केल्याचे मिळते कमिशन; सिलिंडर घेतानाच तपासणी करणे आवश्‍यक

राजेंद्र सोनवणे म्हणाले, या रस्त्याने सार्वजानिक बांधकाम विभागासह सर्वच विभागाचे अधिकारी लोकप्रतिनिधी दररोज प्रवास करत असतात. या महामार्गावरून अवजड वाहनांची वर्दळ तसेच शहरातील महिला, विद्यार्थी, व्यावसायिक, शेतकरी, कष्टकरी शहरात ये- जा करीत असतात.

खड्ड्यांतून उडणाऱ्या पाण्यामुळे महिलांची कुचंबना होते, ती तात्काळ थांबवावी. पिंपळदर ते कळवण व सटाणा- चौगाव रस्त्याचे कामही बांधकाम विभागाने लवकरात लवकर सुरू करावे. महामार्गावरील जीवघेणे खड्डे त्वरित न बुजवल्यास महाविकास आघाडीतर्फे २१ जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशाराही श्री. सोनवणे यांनी दिला.

आंदोलनात राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष व माजी नगरसेवक मनोज सोनवणे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, विलास सोनवणे, संजय पवार, किशोर ह्याळीज, संजय सोनवणे, शिवसेनेचे शरद शेवाळे, लक्ष्मण सोनवणे, गौरव निकम, नितीन सोनवणे आदींसह शेकडो नागरिक सहभागी होते.

Gandhigiri agitation in Satana by Mahavikas Aghadi latest marathi news
मनमाड स्थानकात शुकशुकाट; मुसळधार पावसाचा रेल्वे वेळपत्रकावर परिणाम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com