youth drowning
sakal
जळगाव: गणपती विसर्जनासाठी गेलेला गणेश गंगाधर कोळी (वय २५, रा. ममुराबाद, ता. जळगाव) आणि राहुल सोनार असे दोन तरुण वेगवेगळ्या घटनांत गिरणा नदीपात्रात बुडून बेपत्ता झाले. या तरुणांचा नदीपात्रात शोध घेतला जात आहे. ही घटना शनिवारी (ता.६) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास जळगाव तालुक्यातील भोकणी, निमखेडी शिवारालगत घडली. वाळूमाफियांकडून वर्षभर सुरू असलेल्या बेसुमार उपशामुळे नदीपात्रात मोठमोठे लवण तयार झाले आहेत.