potholes
sakal
इगतपुरी शहर: गणेशविसर्जनाच्या दिवसापर्यंतसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरातील तीनलकडी पुलावर पडलेले खड्डे न बुजविल्याने अखेर शनिवारी (ता. ६) सायंकाळी सहाला गणेशविसर्जन मिरवणूकप्रसंगी कोणत्याही प्रकारे गणेशमूर्तींना नुकसान होऊ नये व धार्मिक, सामाजिक बाधा निर्माण होऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनीच हातात टिकाव अन् फावडे घेऊन खड्डे बुजविले.