Ganesh Visarjan
sakal
नाशिक
Nashik Ganesh Visarjan : वेळेत विसर्जन! नाशिक पोलीस आयुक्तांचा गणेश मंडळांना '२० मिनिटांचा' अल्टिमेटम
Enhanced Security for Ganesh Visarjan in Nashik : विसर्जन मिरवणुकीची मध्यरात्रीच्या आत सांगता होण्यास मदत होऊ शकेल. दरम्यान, गणेश विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही, ड्रोनच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जाणार आहे.
नाशिक: अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीतील प्रत्येक मंडळाला निर्धारित वेळेत आपली कला नाशिककरांसमोर सादर करता यावी, तसेच वेळेत विसर्जन करता यावे, यासाठी प्रत्येक चौकात गणेश मंडळांना आपली कला सादर करण्यासाठी २० मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे. या संदर्भात गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी पोलिसांची चर्चा सुरू आहे. यामुळे विसर्जन मिरवणुकीची मध्यरात्रीच्या आत सांगता होण्यास मदत होऊ शकेल. दरम्यान, गणेश विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही, ड्रोनच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जाणार आहे.