Ganeshotsav 2022 : विसर्जनाच्या पार्श्‍वभूमीवर 16 जीवरक्षकांची नियुक्ती

Lifeguard
Lifeguardesakal
Updated on

नाशिक : गणेश विसर्जनाच्या दिवशी दुर्घटना घडू नये यासाठी महापालिकेकडून १६ जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेकडून ७१ विसर्जन स्थळांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

यामध्ये २९ पारंपरिक विसर्जन स्थळ, तसेच ४२ कृत्रिम तलाव आहे. नैसर्गिक व कृत्रिम स्थळांच्या जागेवरच मूर्ती संकलन केंद्रांचीदेखील उभारणी करण्यात आली आहे. (Ganeshotsav 2022 Appointment of 16 lifeguards in wake of immersion Nashik Latest Marathi News)

Lifeguard
ताहाराबाद ग्रामपंचायतीत गैरव्यवहार प्रकरण; सरपंच शीतल नंदन यांना अखेर अटक

अधिक सुरक्षेचा भाग म्हणून धोकादायक ठिकाणी बॅरेकटिंग करण्यात आली आहे. मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविण्यासह ज्या भागात गाळ साचला आहे तेथे स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहेत. सुरक्षेचा भाग म्हणून सोळा जीवरक्षकांची विविध ठिकाणी नियुक्त करण्यात आली आहे.

असे आहेत जीवरक्षक व त्यांची नियुक्तीची ठिकाणे: रूपचंद काठे (व्यवस्थापक), अरुण पवार (सोमेश्वर धबधब्या समोर), शंकर पाटील (सोमेश्वर महादेव मंदिर परिसर) क्रांती न्याहारकर (आनंदवली पूल परिसर) शिल्पा सुभेदार (अतिरिक्त व्यवस्थापक), संजय पाटील (रोकडोबा तालीम परिसर), अनिल निगळ (केटीएचएम कॉलेज नदी परिसर), शांतवन शिंदे (रोकडोबा तालीम परिसर), सुनील दिघे (हनुमान घाट, घारपुरे घाट), दशरथ दिघे (गांधी तलाव परिसर), कुंदन दळे (यशवंतराव महाराज पटांगण), नितीन निकुंभ (हनुमान घाट, घारपुरे घाट), माया जगताप (अतिरिक्त व्यवस्थापक), रवींद्र ठाकरे (वालदेवी नदी, वडनेर परिसर), अशोक भडांगे (दारणा नदीवरील चेहडी पंपिंग परिसर), सुनंदा मालसाने (अतिरिक्त व्यवस्थापक), वाळू नवले (वालदेवी नदीवरील पाथर्डी दाडेगाव परिसर), गिरीश चव्हाण (पाथर्डी दादेगाव परिसर).

Lifeguard
Dhule : तलवारी नेणारे चौघे‍ गजाआड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com