ताहाराबाद ग्रामपंचायतीत गैरव्यवहार प्रकरण; सरपंच शीतल नंदन यांना अखेर अटक

Sarpanch Sheetal Nandan
Sarpanch Sheetal Nandanesakal

नाशिक : ताहाराबाद ग्रामपंचायतीला विविध विकासकामांसाठी शासनाकडून आलेल्या १४ व १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी सरपंच शीतल नंदन यांना मंगळवारी (ता. ६) सकाळी जायखेडा पोलिसांनी अटक केली. दुपारी त्यांना सटाणा सत्र न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली. (Malpractice Case in Taharabad Gram Panchayat Sarpanch Sheetal Nandan finally arrested Nashik Latest Marathi News)

Sarpanch Sheetal Nandan
Ganeshotsav 2022 : देखावे पाहण्यासाठी गणेशभक्‍तांची रीघ

१९ एप्रिलपासून अटकपूर्व जामिनासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेऊनही जामीन न मिळाल्याने अखेर सरपंच शीतल नंदन जायखेडा पोलिसांना शरण आल्या. बागलाणचे गटविकासाधिकारी यांच्या फिर्यादीवरून जायखेडा पोलिस ठाण्यात सरकारी निधीत अफरातफर व भ्रष्टाचार केल्याप्रकरणी सरपंच शीतल योगेश नंदन, ग्रामविकास अधिकारी स्वप्नील ठोके, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे शाखा अभियंता विनोद पाटकर यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

पाणीपुरवठा योजनेचे शाखा अभियंता विनोद पाटकर याला अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. १६ ऑगस्टला ग्रामविकास अधिकारी स्वप्नील ठोके याला अटक झाली आहे. मात्र, सरपंच शीतल नंदन फरारी झाल्या होत्या. मंगळवारी सकाळी त्या जायखेडा पोलिसांना शरण आल्या. नंतर पोलिसांनी त्यांना सटाणा न्यायालयात हजर केले असता, ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. हवालदार सुनील पाटील तपास करीत आहेत.

"शीतल नंदन गेल्या चार महिन्यांपासून फरारी झाल्या होत्या. मात्र, त्यांच्यावर अफरातफर व भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असल्याने व पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या सबळ पुराव्यांमुळे त्यांना सुप्रीम कोर्टानेही अटकपूर्व जामीन नाकारल्याने त्यांनी स्वतः आत्मसमर्पण केले."

-श्रीकृष्ण पारधी, सहाय्यक पोलिस निरीक्षक, जायखेडा

Sarpanch Sheetal Nandan
Nashik : नैसर्गिक फुलांनी उजळले गुलशनाबाद!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com