Nashik : विसर्जनासाठी विनामूल्य 'Ammonium bicarbonate powder' | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ammonium bicarbonate powder

Nashik : विसर्जनासाठी विनामूल्य 'Ammonium bicarbonate powder'

नाशिक : महापालिकेकडून यंदाही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर विनामूल्य अमोनिअम बायकार्बोनेट पावडर विभागीय स्तरावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

काही वर्षापासून नाशिक शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यानुसार दरवर्षी गणेशाची प्रतिष्ठापना मोठया प्रमाणात दिसून येत आहे. कला, संस्कृती, परंपरा आणि एकोपा याचे प्रतीक म्हणून गणेशोत्सवाकडे पाहिले जाते. (Nashik Free Ammonium bicarbonate powder for immersion of Ganesh Idols Nashik Latest Marathi News)

२०२२ श्री गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा या उद्देशाने महापालिकेकडून पीओपीच्या गणेशमूर्तींचा वापर टाळा व त्याऐवजी शाडू मातीच्या गणेशमूर्तींचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पीओपी मुर्ती आणलीच, तर तिचे अमोनिअम बायोकार्बोनेटच्या मिश्रणामध्ये घरच्या घरी विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विसर्जनाकरिता अमोनिअम बायकार्बोनेट पावडर उपलब्ध करून घेऊन विसर्जन कार्यपद्धती जाणून घ्यावी. निर्माल्य नदीमध्ये न टाकता निर्माल्य कलशाचा उपयोग करा व नदीचे प्रदूषण टाळा. तसेच, थर्माकोल व प्लॅस्टिकचा वापर टाळा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: Ganeshotsav 2022 : शहरात खरेदीदारांत उत्साह; गर्दीचा उच्चांक

अमोनिअम बायकार्बोनेट पावडरसाठी संपर्क

नाशिक पूर्व विभाग : सुनील शिरसाट, विभागीय स्वच्छता निरीक्षक (९४२३१७९१७३). नाशिक पश्चिम विभाग : संजय गोसावी, विभागीय स्वच्छता निरीक्षक (९४२३१७९१७६). पंचवटी विभाग : संजय दराडे, विभागीय स्वच्छता निरीक्षक ( ९७६३२५७७७८), नवीन नाशिक विभाग: संजय कोंडाजी गांगुर्डे, विभागीय स्वच्छता निरीक्षक (९४२३१७९१७१). सातपूर विभाग: माधुरी श्रीधर तांबे, विभागीय स्वच्छता निरीक्षक (८९८३१५९०५६). नाशिक रोड विभाग अशोक साळवे, विभागीय स्वच्छता निरीक्षक (९४२३१७९१७२).

हेही वाचा: Ganeshotsav 2022 : शहरात खरेदीदारांत उत्साह; गर्दीचा उच्चांक

Web Title: Nashik Free Ammonium Bicarbonate Powder For Immersion Of Ganesh Idols Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..